Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर दर्शना आठवले अध्यक्षपदी; पुढील पाच वर्षांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड
ताज्या बातम्या

ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर दर्शना आठवले अध्यक्षपदी; पुढील पाच वर्षांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 12, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर

दर्शना आठवले अध्यक्षपदी; पुढील पाच वर्षांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा येथील विशेष मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था, रोहा या संस्थेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. संस्थेच्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने पुढील पाच वर्षांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेअंतर्गत ‘प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा’ सन २००६ पासून गेली २० वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर अविरतपणे कार्यरत आहे. विशेष मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या शाळेचा आजवरचा प्रवास देणगीदार, पालक आणि समाजातील दातृत्वशील व्यक्तींच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला आहे. विशेष मुलांना शिक्षण, संस्कार आणि आत्मनिर्भरतेची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था सातत्याने करत आहे.
संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ १ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार असल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे एकूण ६७ सभासद असून, सभेला २० सभासद उपस्थित होते. उपस्थित सभासदांच्या आवाजी मतदानाने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी दर्शना दीपक आठवले, उपाध्यक्षपदी संजय रोहिदास आर्ते, सचिवपदी गिरीश हरी मोरे, सहसचिवपदी श्रिया अनिकेत जोशी, खजिनदारपदी राजश्री सचिन आठवले, सहखजिनदारपदी वृषाली दीपक पराडकर, तर सदस्यपदी दिधेश कांतीलाल शहा यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संस्थेचे कार्य अधिक व्यापक करून विशेष मुलांना दर्जेदार शिक्षण, आवश्यक सुविधा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी पालक, देणगीदार आणि समाजातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us