तळा येथील हिरकणी कक्ष,स्वच्छतागृह उद्घाटनाचा मुहूर्त कधी?.झाल्यात शोभेच्या वास्तू.
प्रतिनिधी / किशोर पितळे
तळा एस टी बस स्टँड वर बांधण्यात आलेले स्वच्छता गृह व महीलाबालकल्याण विभागाकडून उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत.स्वच्छतागृहाचे बांधकामा
त दिरगांई झाली जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला पत्रकार बंधूनी वृतपत्राचे माध्यमातून लक्ष वेधले काम पुर्ण झाले मग उद्घाटनाला मुहूर्त कधी लागणार ? स्वच्छतागृह सुरु न झाल्याने विशेष महीला वर्गाची कुचंबणा होत आहे.त्यांना आजूबाजूला आडोशाला आधार घ्यावा लागत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने व प्रवासी वर्ग,जेष्ठ महीला,नागरिक वयोवृद्ध नागरिकांना,चालक,महीला वाहक, विद्यार्थी यांना लघुशंकेला जाता येत नाही सेवा उपलब्ध होऊन हि स्वच्छता गृह बंद आहे.चौकशी केली असता विभागीय कार्यालयातूनआदेशाशिवाय सुरु करता येत नाही. हिरकणी कक्ष सुसज्ज सोयीने असून महींलाना बालकांना स्तनपान देण्यासाठी सुरक्षित जागा असून ही अडचणी निर्माण झाली आहे. हिरकणी कक्ष व स्वच्छतागृह या शोभेच्या वास्तू केल्या आहेत का?असा संतप्त सवाल होतआहे. सणावाराचे दिवस गोकुळाष्टमी गौरी गणपती सण प्रवाशांची वर्दळ वाढणार असल्याने लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी केली जात आहे.