Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»ताप आला काय, पोरगा गेला काय…! २२ वर्षीय वरद पाटीलच्या मृत्यूने गाव हळहळले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
ताज्या बातम्या

ताप आला काय, पोरगा गेला काय…! २२ वर्षीय वरद पाटीलच्या मृत्यूने गाव हळहळले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

ताप आला काय, पोरगा गेला काय…!

२२ वर्षीय वरद पाटीलच्या मृत्यूने गाव हळहळले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

 

रोहा येथील आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केलेला अवघ्या २२ वर्षांचा वरद संतोष पाटील (कोळी) याचा तापाच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांसोबत गावात आल्यानंतर वरदला उपचारासाठी रुग्णालयात गेला. तेथे उपचार सुरू असतानाच अचानक त्याची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव हळहळले आहे.

आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न, छोट्या बहिणीचा आधार आणि कुटुंबाच्या भविष्यातील आशा असलेला वरद अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ताप आला होता, उपचारानंतर तो बरा होईल, अशीच अपेक्षा कुटुंबीयांना होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ज्या मुलासाठी आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले, त्याच मुलाला खांदा देण्याची वेळ त्यांच्यावर आली.

लहानपणापासून हुशार असलेला वरद अत्यंत नम्र, मनमिळावू आणि समजूतदार स्वभावाचा होता. सर्वांशी आपुलकीने वागणे, प्रत्येकाची जाणीवपूर्वक विचारपूस करणे आणि मोठ्यांचा आदर करणे ही त्याची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे तो मित्रपरिवारासह गावातील अनेकांच्या जवळचा होता. कालपर्यंत घरात हसत-खेळत वावरणारा वरद आज केवळ छायाचित्रात उरल्याने त्याच्या परिचितांनाही हा धक्का पचवणे कठीण झाले आहे.

वरदच्या निधनाची बातमी समजताच भुवनेश्वर येथील निवासस्थानी ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी धाव घेतली. आई-वडील, बहीण आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. जड अंतःकरणाने वरदला अखेरचा निरोप देण्यात आला. वैकुंठधाम स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या आकस्मिक मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले असून, वरदच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण स्पष्ट व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अवघ्या २२व्या वर्षी एका होतकरू तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पाटील कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us