Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या बातम्या

नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) राज्यातील विविध भागांत नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ किंवा ‘जनसंपर्क अभियानाचे’ आयोजन केले जात आहे. या उपक्रमांमधून स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि प्रशासकीय अडचणींवर तत्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो. याच अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग १७ मध्ये नगरसेविका डॉ. अस्मिता जगदीश घरत यांनी नुकताच ‘जनता दरबार’ आयोजित करून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या आहेत.
नगरसेविका अस्मिता जगदीश घरत यांनी रविवारी (दि.२२ मार्च) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध खात्यांसंदर्भात असलेल्या १०० हून अधिक तक्रारदारांच्या तक्रारी स्वतः नगरसेविका अस्मिता घरत यांनी जाणून घेत, त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सोडविण्यावर प्रामाणिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.


सकाळी ११ वा. सुरू झालेला जनता दरबार दुपारी ०२ वाजेपर्यंत सुरू होता. यात नागरी सेवा सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले. विशेष म्हणजे वसाहतीमध्ये होत असलेला दूषित पाणीपुरवठा, महापालिका कर शहरात गर्दीच्या व वर्दळी ठिकाणी हायमास्ट उभारणे, सेक्टर १३ ए टाईप वसाहतीमधील गटार दुरुस्ती, पदपथावरील अतिक्रमण, सेक्टर १२ १३, १४ व १७ सह नवीन पनवेल परिसरात परप्रांतीयांच्या वाढत्या अवैध हातगाड्या, रास्त धान्य विक्री दुकान सेक्टर १३ ए टाईप मध्ये सुरु करणे, नवीन पनवेल पिल्लेज कॅम्पस जवळील उद्यानातील रनवेवरील पेव्हरब्लॉकची दयनीय अवस्था, उद्यानातील शौचालयातील पाणी समस्या, खाऊ गल्लीतील हातगाड्यां वरील स्वच्छता, पंचशील नगरातील बौद्धविहार दुरुस्ती, नागरी वसाहती मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, महानगरपालिका वसाहतीत कीटकनाशक फवारणी, मालमत्ता कर, शालेय मैदाना वर खेळविले जात असलेले क्रिकेट व त्यापासून होणारे वायू प्रदूषण तसेच ई१ से.१४ परिसरातील रस्त्यांवर बसविलेले पेव्हरब्लॉक दुरुस्ती करणे, ड्रेनेज लाईनसाठी टाकलेली पाईपलाईन यामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था यासंदर्भात नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या.यावेळी प्रत्येक तक्रारदाराबरोबर नगरसेविका अस्मिता घरत यांनी चर्चा करून प्रश्न जाणून घेतले. आलेल्या तक्रारदारांचे अर्ज संबधित विभागांचे प्रमुख यांच्याकडे पाठविण्यात येणार असून लवकरच योग्य ती कार्यवाही होईल, असे यावेळी उपस्थितांना आश्वासित करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us