तळा येथे हिंदू -मुस्लिम सामाजिक सलोख्याचे ऐक्याचे अनोखे दर्शन.
तळा -किशोर पितळे-संपूर्ण देश व राज्यभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा सण अत्यंत आनंदाने मोठ्या उत्साहात साजरा केला.तालुक्यातील शहरातीलवरचामोहल्ला,मेटमोहल्ला,मांदाड,रहाटाड, कुडे,मजगांव येथील शनीवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी पांढरे शुभ्र कपडे परीधान करून नमाज पठण करून ईद साजरी केली.नमाज अदा केल्यानंतर तळा येथील हिंदूमुस्लिम सामाजिक सलोख्याचे ऐक्याचे अनोखे दर्शन रमजान ईद दिनी पहायला मिळाले एकमेकांना गळाभेट घेत दिल्या ईदच्या शुभेच्छा देऊन मोठ्या उत्साहात आनंदाने रमजान सण साजरा करून सर्व धर्म सम-भाव सामाजिक सलोखा सर्व राजकीय पक्ष भेद न करता कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भेट घेऊन पेढे गुलाबपुष्प, बुके दिले शुभेच्छा दिल्या गेली कित्येक वर्षे हिंदू ,मुस्लिम, बौद्ध बांधव अतिशय गुण्यागोविंदाने सामाजिक बंधू भाव जपला जात आहेत.जातीय सलोखा ऐक्याचे दर्शन दिसून आले.शहरातील वरचा मोहल्ला, मेट मोहल्ला येथे जावून शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक हितचिंतक, स्नेही, मित्रमंडळी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या यामध्ये तळा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते.


