Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जागतिक बुद्धिबळ दिनी रोहा तालुका चेस असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी प्रमोदशेठ म्हसकर
ताज्या बातम्या

जागतिक बुद्धिबळ दिनी रोहा तालुका चेस असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी प्रमोदशेठ म्हसकर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जागतिक बुद्धिबळ दिनी रोहा तालुका चेस असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी प्रमोदशेठ म्हसकर

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रोहा तालुक्यात बुद्धिबळ खेळाचा प्रसार, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन आणि दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून रोहा तालुका चेस असोसिएशन (आरटीसीए) ची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते मा. श्री. प्रमोदशेठ म्हसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी संकेत खोत, उपाध्यक्षपदी अमर सलागरे, सचिवपदी विक्रांत जाना, सहसचिवपदी विवेक कांबळे, खजिनदारपदी महेश बामुगडे आणि सहखजिनदारपदी योगेश भगत यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून आभूषण मिठागरी, विवेक कानडे, ओमकार पवार, अनिकेत पाशिलकर, प्रशांत देशमुख, सुधीर जंगम, रविंद्र कान्हेकर आणि रोहन चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोदशेठ म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुरस्कारातून दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी रोहा येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत २०० खेळाडूंना सहभागी होता येणार असून खुल्या गटासाठी ₹१०० नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. तर १६ वर्षांखालील खेळाडूंना प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
याचबरोबर रोहा तालुक्यातील बाल व युवा बुद्धिबळपटूंना नियमित प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पी. एम. चेस अकॅडमी’ सुरू करण्यात येणार आहे. प्रमोदशेठ म्हसकर यांच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या अकॅडमीतून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत बुद्धिबळपटू घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या प्रमोदशेठ म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुका चेस असोसिएशनच्या माध्यमातून तालुक्यात बुद्धिबळाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
जागतिक बुद्धिबळ दिनी स्थापन झालेली नवी कार्यकारिणी, ९ ऑगस्ट रोजी होणारी भव्य बुद्धिबळ स्पर्धा आणि ‘पी. एम. चेस अकॅडमी’च्या स्थापनेमुळे रोहा तालुक्यात बुद्धिबळ खेळाला नवी दिशा मिळणार असल्याची माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष अमर सलागरे यांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us