ज्येष्ठ पत्रकार , संपादक मनोज घोसाळकर यांचां साप्ताहिक रोहा टाइम्स’चा पत्रकारितेचा वारसा पुढे नेणार सुपुत्र कुणाल घोसाळकर रोहा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि रोहा टाइम्स या साप्ताहिकाचे मुख्य संपादक मनोज घोसाळकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रोहा तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्हा मधील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जवळपास अडीच दशकांहून अधिक काळ त्यांनी निष्ठेने आणि निर्भीडपणे पत्रकारिता करत जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. स्व. मनोज घोसाळकर यांनी २५ वर्षांहून अधिक काळ रोहा टाइम्स या साप्ताहिकाच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न, सामाजिक समस्या, विकासकामे तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी सातत्याने मांडल्या. त्यांच्या लेखणीमध्ये धाडस, प्रामाणिकपणा आणि…

