NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आले.
प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांच्यासह राजेंद्र जाधव, सुहास खरीवले, महेंद्र मोरे, संदीप सरफळे, उद्धव आव्हाड, केशव म्हस्के, ॲड. दीपक जाधव, राकेश मोरे, दीप वायडेकर तसेच प्रदीप देशमुख, नितीन परब, ॲड हर्षद साळवी, तुषार खरीवले, सुनील देखमुख, प्रदीप गुरव,अमित कासट,सोपान सुतार, पांडुरंग वाघमारे, उमेश दुखणे, दिपाली चौलकर आदी उपोषणात सहभागी झाले. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.कोलाड लायन्स क्लबचे अनिल महाडिक, गजानन बामणे, स्वरा महाडिक,प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रमोद म्हसकर,शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख राजेश काफरे यांनी पाठिंब्याचे पत्र देत सहभाग नोंदविला.
NEET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
तर सायंकाळी पाच वाजता रोहा तहसीलदार यांच्या वतीने उपोषण कर्त्याना लिंबू पाणी देऊन या एकदिवसीय अन्नत्याग उपोषणाची सांगता करण्यात आली.