Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
  • रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
  • *नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
  • खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.
  • लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»माणगावातील कलिंगड उत्पादकांच्या अडचणी युवानेते निलेश थोरें यांची कारवाईची मागणी
ताज्या बातम्या

माणगावातील कलिंगड उत्पादकांच्या अडचणी युवानेते निलेश थोरें यांची कारवाईची मागणी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

माणगावातील कलिंगड उत्पादकांच्या अडचणी
युवानेते निलेश थोरें यांची कारवाईची मागणी

(प्रतिनिधी माणगाव) : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरें यांनी माणगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादकांच्या विविध समस्या घेऊन रायगड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेहा भोसले यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष परशुराम सांबळे देखील उपस्थित होते.

भेटीत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणींवर चर्चा झाली. अनेक वेळा काही व्यापारी शेतकऱ्यांना कमी भावात कलिंगड लावण्यासाठी रोपे, औषधे आणि खते पुरवतात, पण नंतर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा फसवणुकीमुळे शेतकऱ्यांना कोणतेही साधन उपलब्ध राहत नाही 

 

निलेश थोरें यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शिफारस केली की, कलिंगड रोपे, खते आणि औषधे विकणाऱ्या सर्व केंद्रांची नोंद स्थानिक तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध असावी. शेतकऱ्यांनी खरेदी करण्यापूर्वी नोंदणीकृत केंद्रातून खरेदी करावी.

डॉ. नेहा भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क साधून राज्य पातळीवर नोंदणीकृत सर्व नर्सरी व औषध विक्रेत्यांची माहिती तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. भविष्यात बनावट वस्तूंचा वापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असेही त्यांनी सुचवले.

यावेळी निलेश थोरें म्हणाले की, माणगाव तालुक्यात शेकडो शेतकरी कलिंगड लागवड करत आहेत, आणि नैसर्गिक वातावरणावर मोठा परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना विश्वासार्ह रोपे व औषधे मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनिक पातळीवर पाठपुरावा केला जाईल, तसेच परिस्थिती सुधारण्यासाठी कृषी बाजारपेठेत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us