Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • *आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.
  • *रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*
  • ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी
  • खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
  • तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.
  • अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.
  • हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप
  • खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री मधुकरशेठ पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.
ताज्या बातम्या

अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.

कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा रेल्वे स्टेशन शेजारी उड्डाण पुलाचे काम मागील तीन चार वर्ष अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे, त्याच कामामुळे दोन्ही बाजूकडील रस्ता कायम धोकादायक ठरतो आहे, याबाबत वारंवार तक्रारी झाल्या, आढावा बैठकीत राग व्यक्त झाला, तो रस्ता संबंधित प्रशासनाने सुरक्षित न केल्याने अखेर गुरुवारी उशिरा सायंकाळी भातसई येथील तरुणासाठी यमदूत ठरला, याआधीही याच रस्त्याने दोघांचा बळी घेतला, त्याच पर्यायी मार्गावरील जीवघेणे खड्ड्यांमुळे संकेत जनार्दन कोतवाल (३२) या निष्पाप पोलीस पाटलाला आपला जीव गमवावे लागला. अपघाताने तालुक्यातून अक्षरशः संताप व्यक्त झाला. या घटनेनंतर संबंध विभाग संतप्त ग्रामस्थांनी अष्टमी रेल्वे फाटकाजवळ ठिय्या आंदोलन करून रोहा नागोठणे अलिबाग मार्ग रोखून धरला व बेफिकीर ठेकेदार, सुस्त रेल्वे प्रशासन आणि बेजबाबदार राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, निर्दयी ठेकेदाराच्या आडमुठ्या वागणुकीने वातावरण काही काळ तणावाचे राहिले, त्यानंतर ग्रामस्थ, प्रशासन यांनी मार्ग काढत पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मोर्चाला शांत करण्यात प्रशासनाला यश आल्याने सुटकेचा निःश्वास सोडला अशीच घटनाक्रम समोर आली आहे.

गुरुवारी उशिरा सायंकाळी भातसई गावातील तरुण पोलीस पाटील संकेत कोतवाल आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना अष्टमी फाटक जवळ आल्यावेळी खड्ड्यातून मार्ग काढत असताना तोल गेला. त्यात तरुण खाली पडला. याचवेळी जाणारी एसटी संकेत कोतवालचा याच्या अंगावर गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र

संतापाची लाट उसळली. अपघात घटनेची माहिती समजताच संतप्त ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धडक देत हल्लाबोल केला, प्रशासनाने आमच्या तरुणाचा बळी घेतला म्हणत मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला. उड्डाण पूल बांधकाम ठेकेदार, रेल्वे प्रशासन व राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे संकेत कोतवाल या तरुणाचा नाहक बळी गेला असून संबधित ठेकेदार विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, मृत पोलीस पाटील याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी व पर्यायी मार्ग दुरुस्तीचा काम जोपर्यंत होत नाही तो पर्यंत उड्डाण पुलाचे काम होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली. या धरणे आंदोलनामुळे महत्वाच्या मार्गावर काही तास वाहतूक ठप्प होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

पीडित कुटुंबाच्या न्यायी आंदोलनात भातसई ग्रामस्थ व अन्य विभागातील शेकडो लोक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात होते. यावेळी कांदा बोलते बटाट्याला, लाज वाटते सरकारला, आजचा सरकार काय बोलते, न्याय द्यायला नाय बोलते… न्याय द्या न्याय द्या, पोलीस पाटलाला न्याय द्या… धिक्कार असो धिक्कार असो, रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो… अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. ग्रामस्थांनी आपला राग व्यक्त केला, आंदोलनात महिलांनी मोठा सहभाग घेत रस्त्याला कारणीभूत असणाऱ्या सर्वच व्यवस्थेचा उदो उदो केला. दरम्यान, दुपारी उशिरा कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे ठरवून संतप्त आंदोलकांना शांत करण्यात प्रशासनाला यश आल्याचे सांगण्यात आले तर रस्ता सुरक्षित करत नाहीत तोपर्यंत रेल्वे उड्डाण पुलाचे काम करू देणार नाही असा इशारा विभागीय आंदोलनकर्त्यांनी दिला आहे, पुढे रस्ता सुरक्षित करण्यात संबंधित प्रशासन कितपत शुद्धीवर राहतो ? हे पाहावे लागणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

July 11, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

July 13, 2026

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

July 11, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us