Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कोमसाप रायगडची वर्षासहल उत्साहात; कवी संमेलन, कराओके आणि साहित्यिक खेळांनी रंगली मैफल
ताज्या बातम्या

कोमसाप रायगडची वर्षासहल उत्साहात; कवी संमेलन, कराओके आणि साहित्यिक खेळांनी रंगली मैफल

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 8, 2026Updated:July 8, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कोमसाप रायगडची वर्षासहल उत्साहात; कवी संमेलन, कराओके आणि साहित्यिक खेळांनी रंगली मैफल

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रायगड जिल्ह्यातील रोहा, तळा व मुरुड शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय साहित्यिक वर्षासहल शनिवार व रविवार, दि. ४ व ५ जुलै २०२६ रोजी तळा तालुक्यातील निसर्गरम्य महुरे येथील स्मिहील फार्म हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. साहित्य, संगीत आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवत चोवीस साहित्यिकांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटला.
वर्षासहलीत बहारदार कवी संमेलन, कराओके गायन, साहित्यिक खेळ तसेच पोहण्याचा आनंद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या रम्य वातावरणात रंगलेल्या कवी संमेलनात पाऊस, जीवन, ईश्वर, प्रेम, नातीगोती, आभाळ अशा विविध विषयांवरील दर्जेदार कविता सादर झाल्या. कवींच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोमसाप रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक तथा रायगड भूषण सुखद राणे, नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त दिपाली दिवेकर तसेच पाली शाखाध्यक्ष धनंजय गद्रे (गुरुजी) उपस्थित होते. तळा शाखेने कवी संमेलनाचे, मुरुड शाखेने साहित्यिक खेळांचे तर रोहा शाखेने कराओके गायनाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रमाला चार चाँद लावले.
ही वर्षासहल यशस्वी करण्यासाठी रोहा शाखाध्यक्ष संध्या दिवकर, सचिव विजय दिवकर, तळा शाखाध्यक्ष संदीप जामकर, सचिव कृष्णा कांबळे, रायगड जिल्हा ग्रामसेवक युनियनचे उपाध्यक्ष उमाजी माडेकर, कवयित्री उल्का माडेकर, रायगड जिल्हा युवाशक्ती प्रमुख सिद्धेश लखमदे तसेच हेमंत बारटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
साहित्यिकांच्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करताना नवचैतन्य, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जिव्हाळ्याची अनुभूती देणारी ही वर्षासहल सर्व सहभागींच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थित साहित्यिकांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us