Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • *आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.
  • *रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*
  • ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी
  • खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
  • तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.
  • अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.
  • हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप
  • खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री मधुकरशेठ पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तटकरे साहेबांचा वाढदिवस स्व. अजितदादा पवार यांना अभिप्रेत असेच समाजोपयोगी उपक्रम घेत साजरा करणार:- कार्याध्यक्ष समीर शेडगे
ताज्या बातम्या

तटकरे साहेबांचा वाढदिवस स्व. अजितदादा पवार यांना अभिप्रेत असेच समाजोपयोगी उपक्रम घेत साजरा करणार:- कार्याध्यक्ष समीर शेडगे

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तटकरे साहेबांचा वाढदिवस स्व. अजितदादा पवार यांना अभिप्रेत असेच समाजोपयोगी उपक्रम घेत साजरा करणार:- कार्याध्यक्ष समीर शेडगे

महिला आरोग्य तपासणी, शालेय क्रीडा महोत्सव,पौष्टिक पाक कला स्पर्धा, अपंग स्टॉल वितरण यांचे आयोजन

कोलाड (श्याम लोखंडे)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहे अष्टमी नगरपरिषद हद्दीत ना. अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रोहा यांच्या संयोजनातून तसेच रोहा नगर परिषद यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि
भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी शहर हद्दीतील महिलांनी तसेच नगरपरिषद हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि खुले गटातील खेळाडूंनी या विविध क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी पत्रकार परिषदेतून केली.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या दुर्दैवी अपघाती निधनातून आजही राष्ट्रवादी चा कोणताही कार्यकर्ता सावराला नाही. पण दादा हयात असताना मी जसा अहोरात्र सर्वसामान्य जनतेची कामे करतो तसे माझ्या कार्यकर्त्यांनी करावी असा संदेश ते प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून व कृतीतून कार्यकर्त्यांना देत होते. यावेळी दादांच्या अकाली निधनामुळे माझा वाढदिवस साधेपणात साजरा करावा अशी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय खा. सुनिल तटकरे यांची सदिच्छा होती. पण दादांना अभिप्रेत असे उपक्रम राबवत आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू अशी इच्छा प्रत्येक रोहा तालुका, शहर पदाधिकारी कार्यकर्ता यांनी व्यक्त केली. त्यानुसार येत्या 10 जुलै रोजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या आठवड्यात महिला आरोग्य तपासणी, शालेय क्रीडा महोत्सव, पौष्टिक पाक कला स्पर्धा, अपंग व्यक्ती स्टॉल वाटप, शालेय विद्यार्थी छत्री वाटप, दमखाडी शाळा दुरुस्ती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये रोहा अष्टमी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी पत्रकार परिषद घेत केले आहे. रोहा अष्टमी शहर कार्यालय येथे घेतलेल्या या पत्रकार परिषद प्रसंगी रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, नीता हजारे, रवींद्र चाळके, उपसभापती गौरी बारटक्के, नगरसेविका पूर्वा मोहिते, स्वप्नील धनावडे, प्रेषित बारटक्के, युवक शहर अध्यक्ष सागर भोबड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष,रायगड चे खा. सुनिल तटकरे यांचा 10 जुलै रोजी 72 वा वाढदिवस आहे. यावेळी खा. तटकरे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना मोलाची साथ लाभलेले त्यांचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांचे अकाली निधनाच्या धक्यातून त्यांच्यासह राष्ट्रवादी चा कोणताही कार्यकर्ता अजूनही सावरलेला नाही. मात्र आपल्या स्व.नेत्याने दिलेली जनसेवेची शिकवण लक्षात घेत यावेळी त्यांना अभिवादन ठरेलं असे उपक्रम राबवत यावर्षी वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार रोहा अष्टमी मधील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला आहे. त्यानुसार महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत रायगड जिल्ह्यात प्रथमच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचे नेतृत्वाखाली , नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे सहकार्याने सभापती नीता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के व सर्व महिला नगरसेविका यांचे संकल्पनेतू सुदर्शन कंपनी च्या सी एस आर निधी मधून 7 व 8 जुलै रोजी मोबाईल मेमोग्राफी व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे.या माध्यमातून महिलांचे मधील स्तन, गर्भाषय, मुख कॅन्सर याविषयी जनजागृती व तपासणी करण्यात येणार आहे. यासोबत महिलांचे मधील उच्च रक्तदाब, मधुमेह, ऍनिमिया(रक्तक्षय ) यांचीही तपासणी या वेळी करण्यात येणार आहे. यासोबत रोहा अष्टमी मधील शालेय विद्यार्थी व नागरिकांचे साठी डॉ. सी डी. देशमुख विद्यासंकुल येथे स्व. अजितदादा पवार क्रीडा नगरी उभारून या निमित्ताने कॅरम, बॅडमींटन, शालेय शालेय क्रीडा स्पर्धा, रंग भरणे स्पर्धा तसेच मैदानी व बैठे खेळांचा क्रीडा महोत्सव व विविध खेळ होणार आहे. तसेच खेळतील विजयी खेळाडूला रोख रक्कम आणि ट्रॉफी असे पारितोषिक, प्रमाणपत्र तसेच सहभागी खेळाडूंना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

आजकाल खाद्य पदार्थ यांचा रोजच्या खाण्यात वाढ होत आहे मात्र यामुळे शरीराला पोषक अन्न घटक उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक व्याधीना सामोरे जावे लागत आहे. हे ओळखून शरीराला पोषक तत्वे देणारे खाद्य पदार्थ म्हणून महिलांकरिता पाक कला स्पर्धा महिला व बालकल्याण समिती च्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर शहरातील दोन उच्च शिक्षित दिव्यांगनंना त्यांचे उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतंत्र व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यासोबतच शहरातील रिक्षा चालकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी दोन वॉटर कुलर ही देण्यात येणार आहेत.तसेच दमखाडी येथील शाळेला सी एस आर निधीतून फॉलसिलिग आणि विविध काम करण्यात येणार आहे. तर हे सर्व उपक्रम हे रोहे अष्टमी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी असून या उपक्रमात रोहा अष्टमी शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोहा अष्टमी शहर राष्ट्रवादी च्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

July 11, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

July 13, 2026

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

July 11, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us