Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
  • रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
  • *नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
  • खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.
  • लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्यात ‘वलगणी’ची पर्वणी; दहा-बारा किलोच्या शिवड्याने रंगली तालुकाभर चर्चा!
ताज्या बातम्या

रोह्यात ‘वलगणी’ची पर्वणी; दहा-बारा किलोच्या शिवड्याने रंगली तालुकाभर चर्चा!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात ‘वलगणी’ची पर्वणी; दहा-बारा किलोच्या शिवड्याने रंगली तालुकाभर चर्चा!

पावसाच्या पहिल्याच वलगणीनंतर नदी-नाले गजबजले; चविष्ट माशांसाठी मत्स्यप्रेमींची पहाटेपासून झुंबड

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा

पावसाळ्याची चाहूल लागताच रोहा तालुक्यात पारंपरिक ‘वलगणी’चा हंगाम सुरू झाला असून नदी, नाले, कालवे, डबकी आणि शेतांमधील पाण्याच्या ओघात विविध जातींच्या चविष्ट माशांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या वलगणीनंतर पहाटेपासूनच तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि मत्स्यप्रेमींनी खांद्यावर पागीर, हातात कांडाळ व कंटाळ घेऊन नदीकाठ गाठल्याचे उत्साहवर्धक चित्र तालुकाभर पाहायला मिळाले.
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे आल्याने मत्स्यप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. तासनतास पाण्यात उभे राहून मासेमारी करण्याची पारंपरिक पद्धत आजही कायम असल्याचे दिसून आले. अनेकांनी सकाळपासूनच नदी, नाले, कालवे आणि शेतातील साचलेल्या पाण्यात मासेमारीचा आनंद लुटला.
या हंगामात आरले, कटले, मले, शिवडा, शिंगट्या, दाडां, खड्या, खवल्या यांसारख्या स्थानिक आणि चविष्ट माशांना विशेष मागणी असते. विशेष म्हणजे वलगणीच्या काळात मिळणारे हे मासे अंड्यांनी भरलेले असल्याने त्यांच्या चवीला वेगळीच लज्जत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील घराघरांत सध्या या माशांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी रंगू लागली आहे.
पिगळसई, मेंढा, खांब, धाटाव, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द, निवी, तळाघर, लांढर, बोरघर, वाशी, महादेववाडी, मलखंडवाडी, वरसे आणि तिसे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मासेमारी झाली. नदी, नाले, डबकी, शेतातील पाण्याचे प्रवाह आणि कालव्यांमध्ये आलेल्या पाण्यामुळे मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी कंटाळ टाकून, तर काहींनी पागीर आणि कांडाळाच्या सहाय्याने तासनतास मासेमारी केली.
दरम्यान, मुठवली गावातील अनिकेत या तरुणाने तब्बल दहा ते बारा किलो वजनाचा शिवडा पकडल्याने संपूर्ण रोहा तालुक्यात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा शिवडा मिळणे दुर्मिळ मानले जात असल्याने त्याच्या या पकडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मत्स्यप्रेमींकडून अनिकेतचे कौतुक होत असून अनेकांनी त्याच्याकडून या दुर्मिळ पकडीची माहिती जाणून घेतली.
रोहा तालुक्यात पावसाळ्यातील ‘वलगणीचे मासे’ ही केवळ खाद्यसंस्कृती नसून अनेक वर्षांपासून जपली गेलेली लोकपरंपरा आहे. पहिल्या पावसाच्या वलगणीनंतर मासेमारीसाठी गावागावांतील नागरिक नदीकाठावर जमा होतात आणि हा उत्सवच साजरा करतात. यंदाही निसर्गाने भरभरून साथ दिल्याने रोहा तालुक्यातील नदी-नाले पुन्हा एकदा गजबजले असून चविष्ट वलगणीच्या माशांची पर्वणी अनुभवायला मिळत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us