Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*मंडणगड : दारूच्या वादातून खून की खैर तस्करीचा रॅकेट?
ताज्या बातम्या

*मंडणगड : दारूच्या वादातून खून की खैर तस्करीचा रॅकेट?

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मंडणगड : दारूच्या वादातून खून की खैर तस्करीचा रॅकेट?

प्रतिनिधी (समीर बामुगडे

मंडणगड तालुक्यातील शेनाळे बर्गेवाडी या दुर्गम भागात ३० जून २०२६ रोजी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास एका खुनाची घटना घडली. सदु सखाराम मोकाशी (वय ४२, मूळ रा. मोकाशी पाडा, ता. जव्हार, जि. पालघर, सध्या रा. बर्गेवाडी, शेनाळे) या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाने संपूर्ण मंडणगड तालुक्यात खळबळ उडवली असून, हा खून केवळ दारूच्या छोट्या वादातून झाला की त्यामागे खैर लाकडाच्या तस्करीचे मोठे रॅकेट दडले आहे, याबाबत परिसरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

पोलीस रजिस्टर नंबर गु.र.नं. ७५/२०२६ (मंडणगड पोलीस ठाणे)मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०, मूळ रा. मोकाशी पाडा, ता. जव्हार, जि. पालघर, सध्या रा. बर्गेवाडी, शेनाळे) याने मयत सदु मोकाशी यांच्याशी दारू पिण्याच्या मुद्द्यावरून वाद घालला. वाद तीव्र झाल्याने आरोपीने झोपेत असलेल्या मयताच्या डोक्यात दगडाने वार करून त्याला जागीच ठार मारले. दोघेही बर्गेवाडी येथील एका कात फैक्टरीत कामगार म्हणून कार्यरत होते. फिर्यादी विजय सिताराम काते (वय ४९, रा. बर्गेवाडी, शेनाळे) यांनी ३० जून रोजी सकाळी ११.५३ वाजता फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीला त्याच दिवशी सायंकाळी ८.४९ वाजता अटक केली. गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

मयत सदु सखाराम मोकाशी व आरोपी प्रकाश वाजे हे दोघेही पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आहेत. ते खैर लाकडापासून कात तयार करणाऱ्या कंपनीत काम करत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी खुनामागे दारूचा वाद नसून, खैर तस्करीतील आर्थिक हितसंबंध, स्पर्धा किंवा कामगार नियंत्रणाचे कारण असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कात कंपनीचा खैर लाकडाशी थेट संबंध असल्याने, तस्करी रॅकेटशी जोडले जाण्याची चर्चा जोर धरत आहे.

याशिवाय, फिर्यादी विजय सिताराम काते हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर खैर चोरी, खंडणी, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याखालील गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे या प्रकरणात केवळ आरोपीच्या बाजूने नव्हे तर फिर्यादीच्या बाजूनेही सखोल तपास व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

मंडणगड पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, “प्राथमिक तपासात दारूच्या वादाचे कारण समोर आले आहे. मात्र, सर्व शक्यता खुल्या ठेवून आम्ही दोन्ही बाजूंनी तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी काम करत आहे. लवकरच खुनामागील खरे कारण उघड होईल.

या घटनेमुळे शेनाळे घाट परिसरातील कात उद्योग आणि आदिवासी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे निष्पक्ष व सखोल तपासाची मागणी केली असून तसेच या खून प्रकरणात रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष देवून पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाज्या खून करणा-याचा चेहरा जनते समोर आणू या कुटूंबाला न्याय मिळावा अशी मागणी पालघर जिल्हा आदिवासी संघटने कडून रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांनी केली आहे,

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us