Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
ताज्या बातम्या

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

अग्निदमन मंगेश जाधव व टीमचा यथोचित सन्मान.

रोहा प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दरवर्षी वटपौर्णिमेचे औचित्य साधून विविध ठिकाणी वृक्षारोपण करणाऱ्या रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपोयोगी, त्यातही पर्यावरण पूरक असतात, झाडे ऑक्सिजन देतात, प्रत्येकाने झाडे लावून आपल्या ऑक्सिजनची सोय करावी, जंगल टिकले, वाढली पाहिजेत, पर्यावरण जागृती व संवर्धनात पत्रकारांचे काम हे कौतुकास्पद आहे, आजचा वृक्षारोपण हे त्याचेच द्योतक आहे असे तसेच मानसी चौदा ते पंधरा झाडे लाऊन ती जगवा असे प्रतिपादन सुदर्शन कंपनीचे साईट हेड विवेक गर्ग यांनी केले. ते रोहा प्रेस क्लब आयोजित अष्टमी येथील रोहिदास नगर रस्ता दुतर्फा मार्ग वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात वणवा विझविण्यात निस्वार्थ महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या किल्ला आदिवासी वाडीतील तरुण मंगेश जाधव व त्यांची टीमचा मान्यवर विवेक गर्ग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. तर अग्निदमन मंगेश जाधव व टीमचा केलेल्या सन्मानाचे संबंध तालुक्यातून कौतुक होत आहे, यावेळी गर्ग यांनी सदर तरुणाला योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीतील रोहिदास नगर येथे रस्ता दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रमाचे रोहा प्रेस क्लबने सोमवारी आयोजन केले, दरवर्षी वटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्याची परंपरा यावर्षीही रोहा प्रेस क्लबने कायम ठेवली. महिला कक्ष प्रमुख समिधा अष्टीवकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम सुदर्शन कंपनीचे हेड विवेक गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी वनपाल प्रवीण शिंदे प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे , रवी दिघे, अमर चंदने, कार्याध्यक्ष नाना खरीवले, पर्यावरण प्रेमी राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव रविंद्र कान्हेकर, महेंद्र मोरे, उद्धव आव्हाड, रुपेश रटाटे, विश्वजित लुमन, अंजुम शेटे, केशव म्हस्के व पत्रकार परिवार उपस्थित होता. प्रमुख अतिथी विवेक गर्ग यांनी रोहा प्रेस क्लबच्या सर्वच उपक्रमाचे कौतुक केले, झाडे, जंगल संवर्धन करणे काळाची गरज आहे, यात आमचाही पुढाकार कायम राहिला आहे, प्रत्येकाने आपल्या ऑक्सिजनाची सोय करावी असे सांगत अग्निदमन मंगेश जाधव व वणवा भिजविण्यात अग्रेसर राहिलेल्या तरुणांचे विशेष कौतुक केले, त्यांच्या कामाची दखल प्रेस क्लबने घेतली हेही मनाला भावणारे आहे असे गर्ग यांनी मनोगतात व्यक्त केले, जाधव याला आपण कामातून सहकार्य करू असेही गर्ग यांनी आश्र्वासित केले, वनपाल प्रवीण शिंदे यांनी वणवा लागण्याची कारणे व नियंत्रण यावर भाष्य करत जंगल वाचवा जनजागृतीवर भर देण्याची गरज व्यक्त केली, लोकांचा सहभाग हीच आमची ताकद आहे असे शिंदे यांनी सांगितले, प्रास्ताविकात राजेंद्र जाधव यांनी रोहा प्रेस क्लबच्या उपक्रमाची मुख्यतः शेती पर्यावरण कार्याची माहिती देत पत्रकार पर्यावरण संवर्धन कार्यक्रमातही आघाडीवर आहेत असे मत व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्याम लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us