Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
ताज्या बातम्या

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत ‘युवा आधार, रोहा’ या सामाजिक संस्थेच्या वतीने घट कांबळे वसतिगृह येथे शैक्षणिक साहित्य वितरणाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत रोहा, माणगाव व पाली परिसरातील ११० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला रोहा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते महेंद्र गुजर, नगरसेविका पूर्वा पप्पू मोहिते, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोष खेरटकर, बौद्ध युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, शिक्षक व पत्रकार नंदकुमार मरवडे, अक्षरवेल फाउंडेशनचे अध्यक्ष सौरभ चव्हाण तसेच समाजसेवक बिलाल मोरबेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी विश्वनाथ जाधव, नरेश गायकवाड, विलास कांबळे, चंद्रशेखर कांबळे, मिथुन इंगळे, चिन्मय गायकवाड, सोमनाथ वाघमारे, यश खंडागले, अक्षय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘युवा आधार’चे संस्थापक अध्यक्ष संदेश गायकवाड, कार्याध्यक्ष चेतन गायकवाड, उपाध्यक्ष सुमित आगळे व किशोर कान्हेकर, सरचिटणीस प्रफुल्ल कांबळे, सहसचिव महेंद्र थिटे, मुख्य सल्लागार निलेश शेडगे, महिला अध्यक्षा कोमल गायकवाड, मुख्य प्रवक्त्या अदिती वाटवे, मुख्य समन्वयक अमित पेणकर आणि डिजिटल मीडिया समन्वयक अभिषेक सानप यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अमित नरेश शिंदे यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘युवा आधार’ संस्थेच्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक करत, भविष्यातही अशा विधायक उपक्रमांना आपले सहकार्य व भक्कम पाठबळ कायम राहील, अशी ग्वाही दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, ‘युवा आधार, रोहा’ संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे रायगड जिल्ह्यासह सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us