Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पत्रकारांना धमकी प्रकरणी रोहा प्रेस क्लबचे निवेदन; खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध
ताज्या बातम्या

पत्रकारांना धमकी प्रकरणी रोहा प्रेस क्लबचे निवेदन; खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पत्रकारांना धमकी प्रकरणी रोहा प्रेस क्लबचे निवेदन; खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत रोहा प्रेस क्लबच्या वतीने मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लब यांच्या आवाहनानुसार शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले. पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली भाषा, शिवीगाळ तसेच धमकीवजा वक्तव्ये ही अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे काम करत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे किंवा भीतीचे वातावरण तयार करणे ही गंभीर बाब असल्याचे रोहा प्रेस क्लबच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी आजच्या राजकारणात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जपला जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पत्रकारांबाबत अवमानकारक भाषा वापरणाऱ्या व धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, रायगड प्रेस क्लबचे राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष सुहास खरीवले, सचिव रविंद्र कान्हेकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, अंजुम शेट्ये, मुख्य संघटक उद्धव आव्हाड , सहसचिव दीपक भगत, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार मरवडे, संघटक संतोष सातपुते, सागर जैन, संदीप सरफळे, महेंद्र मोरे, राकेश मोरे, भिवा पवार यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनाद्वारे पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे, संबंधित वक्तव्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकारांच्या सन्मान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us