Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलची मासिक सभा उत्साहात संपन्न; नवे नेतृत्व, नवे संकल्प!
ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलची मासिक सभा उत्साहात संपन्न; नवे नेतृत्व, नवे संकल्प!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलची मासिक सभा उत्साहात संपन्न; नवे नेतृत्व, नवे संकल्प!

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलची मासिक सभा अध्यक्ष रो. विजय दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली बयोज फार्म येथे निसर्गरम्य वातावरणात, उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यानंतर सभेचे औपचारिक स्वागत अध्यक्ष रो. विजय दिवकर यांनी करत सर्व सभासदांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष (2026-27) रो. लक्ष्मण मोरे यांचे विशेष उपस्थितीत स्वागत करण्यात आले. त्यांचा गौरवपूर्ण परिचय व स्वागत रो. मयुर दिवेकर यांनी केले.
सचिव रो. राकेश कागडा यांनी मागील वर्षातील प्रकल्पांचा सविस्तर लेखाजोखा मांडत, सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. पुढील वर्षातही त्याच जोमाने आणि एकोप्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
रो. मनोज बोराना यांनी मनोगत व्यक्त करत अध्यक्ष रो. विजय दिवकर यांच्या कार्यकाळाचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लब अधिक संघटित आणि सक्रिय झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मावळते अध्यक्ष रो. विजय दिवकर यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत, प्रत्येक उपक्रमात सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यकाळात पत्नी अॅन्स रो. संध्या दिवकर यांच्या माध्यमातून महिलांचा सक्रिय सहभाग वाढला असून, रोह्यातील भटहॉल येथे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित झाल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
माजी अध्यक्ष तथा रोहा अष्टमी नगरपरिषदेचे सभापती रो. मयुर दिवेकर यांनी रोटरी क्लबच्या स्थापनेपासून (2017-18) आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. कोविड काळातील आव्हानात्मक परिस्थितीतही सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष रो. लक्ष्मण मोरे हे CSR माध्यमातून प्रभावी उपक्रम राबवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत पुढील कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
सचिव : रो. मनोज बोराना
खजिनदार : रो. रुपेश चौधरी
या निवडीस रो. राकेश कागडा यांनी अनुमोदन दिले. तसेच विविध विभागांसाठी BOD (Board of Directors) ची स्थापना करण्यात आली.
दिनांक 1 जुलै 2026 पासून नवनिर्वाचित अध्यक्ष रो. लक्ष्मण मोरे अधिकृतपणे पदभार स्वीकारून वर्षभरातील उपक्रम यशस्वीरीत्या राबवतील, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष रो. विजय दिवकर यांनी सर्वांचे आभार मानले. बयोज फार्म येथे निसर्गसंपन्न वातावरणात सभेचा समारोप उत्साहात झाला.
रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत “जय रोटरी, जय जय रोटरी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us