Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोलाड, खांब, सुतारवाडी, विभागीय कुणबी समाज एकटवला,प्रमोदशेठ म्हसकर यांच्या माध्यमातून विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा.
ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोलाड, खांब, सुतारवाडी, विभागीय कुणबी समाज एकटवला,प्रमोदशेठ म्हसकर यांच्या माध्यमातून विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोलाड, खांब, सुतारवाडी, विभागीय कुणबी समाज एकटवला,प्रमोदशेठ म्हसकर यांच्या माध्यमातून विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा.

कोलाड (श्याम लोखंडे)

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागात ग्रुप कोलाड,खांब, आणि सुतारवाडी यांच्या वतीने व कुणबी युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोदशेठ अनंत म्हसकर यांच्या विशेष सहकार्यातून रविवारी 21 जून रोजी कोलाड येथे भव्य दिव्य इयत्ता दहावी बारावी सह उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सन्मान सोहळा तसेच कुणबी जोडो अभियान आयोजित करण्यात आला असून यासाठी विभागीय कुणबी समाज ग्रुप कोलाड,खांब,आणि सुतारवाडी यांच्या वतीने कोलाड विभागीय अध्यक्ष राजेश कदम सह खांब, सुतारवाडी विभागीय पदाधिकारी कुणबी समाजाचे कार्यसम्राट युवानेते तथा गोर गरिबांचे आधारवड प्रमोदशेठ अनंत म्हसकर यांच्या कुशल नेतृत्वखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोलाड, खांब, आणि सुतारवाडी विभागीय पदाधिकारी एकटवले आहेत.

सदरच्या या कार्यक्रमासाठी अथवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्याच बरोबर कुणबी जोडो अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाच्या विषयावर यावेळी मौलिक मार्गदर्शन डॉ. सागर विठोबा सानप मुंबई आणि युवराज संतोष कांबळे अध्यक्ष कुणबी युवा मुंबई संघ यांचे लाभणार आहे.तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, रायगड जिल्हा कुणबी समाजोन्नती संघ तसेच तालुक्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोलाड परिसरातील कै.द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रमोदशेठ म्हसकर यांचे कार्य हे केवळ सामाजिक मदतीपुरते मर्यादित नसून ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. शिक्षण, क्रीडा, कामगार आणि सामाजिक समता या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.तसेच कुणबी समाजातील शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी एक चांगली दिशा मिळावी तसेच त्यांचा शैक्षणिक विकास करणे या उद्देशाने तसेच कुणबी जोडो अभियान अंतर्गत समाजाला देखील एक चांगली दिशा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी कुणबी समाज कोलाड, खांब, आणि कुडली या विभागातील शैक्षणिक वर्ष 2025/26 इयत्ता दहावी, बारावी,पदवीधर आणि इंजिरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव आणि त्यांचा सन्मान सोहळा सोबत त्यांना करिअर मार्गदर्शन आणि समाज बांधवांना समाजविषयाची अधिक भावना निर्माण व्हावी यासाठी देखील कुणबी जोडो अभियानातून मार्गदर्शन घडणार असून यासाठी या परिसरातील विद्यार्थी वर्ग आणि कुणबी समाज बांधवांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोलाड विभागीय कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेश कदम हे करत असून त्याची जनजागृती गाव पातळीवर पदाधिकारी वर्ग समावेत करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us