Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत!
  • स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रोह्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ३१२ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन
ताज्या बातम्या

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रोह्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ३१२ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 15, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रोह्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ३१२ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रोहा-अष्टमी नगर परिषद, डॉ. भट नर्सिंग होम, वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्व. दत्ताजीराव ग. तटकरे रक्तपेढी, अष्टमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४ जून २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहाशेजारी जेष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ३१२ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन रोहा नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, डॉ. रघुनाथ भट सौ.मंजिरी भट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अपूर्व भट यांनी रोह्यात तटकरे रक्तपेढीची शाखा सुरू झाल्यानंतर झालेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, यापूर्वी आपत्कालीन रुग्णांसाठी अलिबाग, माणगाव किंवा महाड येथून रक्त मागवावे लागत असे. रक्त उपलब्ध होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत होता. गंभीर रुग्णांसाठी हा वेळ अत्यंत मोलाचा असतो. मात्र रोह्यात रक्तपेढीची सुविधा उपलब्ध झाल्यापासून बहुतांश वेळा केवळ १५ ते २० मिनिटांत रक्त उपलब्ध होत असून अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे.

डॉ. भट यांनी पुढे सांगितले की, गेल्या एक-दोन महिन्यांपासून रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा वनश्री शेडगे आणि तटकरे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांशी सातत्याने चर्चा सुरू होती. सुमारे दहा दिवसांपूर्वी हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर डॉ. अपूर्व भट आणि डॉ. पूजा भट यांनी विविध सामाजिक संस्था, मंडळे, व्यापारी संघटना तसेच नागरिकांच्या भेटी घेऊन रक्तदानासाठी आवाहन केले.

डॉ. रघुनाथ भट यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत रोह्यातील रुग्णांसाठी तटकरे रक्तपेढीकडून सुमारे १५०० रक्तपिशव्यांचा वापर करण्यात आला आहे. मात्र या कालावधीत विविध शिबिरांतून केवळ ७०० रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. त्यामुळे रक्तदानाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत होती.

डॉ. पूजा भट यांनी रोहा-अष्टमी नगर परिषदेचे तसेच नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे विशेष आभार मानले. नगर परिषदेमार्फत ज्येष्ठ नागरिक सभागृह उपलब्ध करून देण्यात आले. तसेच नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. या उपक्रमाला नगर परिषदेचा संपूर्ण पाठिंबा लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

मोठ्या प्रमाणात रक्तदान व्हावे आणि रोह्यातील रक्तपेढीमध्ये रक्तसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी सर्व डॉक्टर आणि नगराध्यक्षांनी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला रोहेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३१२ रक्तपिशव्यांचे संकलन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान यापूर्वी रोह्यात कधीही झाले नव्हते. सामाजिक बांधिलकी जपत रोहेकरांनी रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेचा आदर्श घालून दिला.

सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल , लायन्स क्लब रोहा, रोहा-अष्टमी नगर परिषदेचे कर्मचारी, डॉ. अपूर्व भट यांच्या रुग्णालयातील कर्मचारी, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच तटकरे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

“एक रक्तदान… अनेक जीवांना जीवनदान!” हा संदेश प्रत्यक्षात साकार करत रोहेकरांनी जागतिक रक्तदाता दिनाला सामाजिक ऐक्य आणि मानवसेवेचा अनोखा संदेश दिला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत!

June 30, 2026

स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण

June 30, 2026

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत!

June 30, 2026

स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण

June 30, 2026

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us