Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*वरसे ग्रामपंचायत आरक्षण सोडतीत गोंधळ; नागरिकांकडून तहसीलदारांकडे खुलाशाची मागणी*
ताज्या बातम्या

*वरसे ग्रामपंचायत आरक्षण सोडतीत गोंधळ; नागरिकांकडून तहसीलदारांकडे खुलाशाची मागणी*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 13, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*वरसे ग्रामपंचायत आरक्षण सोडतीत गोंधळ; नागरिकांकडून तहसीलदारांकडे खुलाशाची मागणी*

रोहा:समीर बामुगडे

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मात्र, रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे, शासन निर्णय (GR) तसेच प्रभागनिहाय लोकसंख्येची अचूक माहिती नसल्याने उपस्थित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचे समाधान होऊ शकले नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक ६ मध्ये अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या नसतानाही त्या प्रभागावर आरक्षण कसे पडले, याचे स्पष्ट उत्तर संबंधित अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्यामुळे सभागृहात प्रश्नांची सरबत्ती झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

यावेळी महिला आरक्षणाची सोडत काढताना देखील गोंधळ झाल्याचा आरोप आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये सुरुवातीला दोन महिला आरक्षणे पडल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सोडत घेऊन आणखी एक महिला सर्वसाधारण आरक्षण घोषित झाल्याने त्या प्रभागातील तिन्ही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याचे उपस्थितांसमोर सांगण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही झाल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, नंतर अधिकृत यादीत प्रभाग क्रमांक १ मधील एका महिला आरक्षणाच्या जागी सर्वसाधारण जागा दाखविण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. लोकांसमोर झालेल्या सोडतीनंतर पडद्यामागे बदल का करण्यात आला, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

याबाबत निवडणूक अधिकारी गुंड यांना विचारले असता, महिला आरक्षणाची एक जागा चुकून जास्त घोषित झाली होती. ही बाब नंतर निदर्शनास आल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही दुरुस्ती सोडतीच्या ठिकाणीच आणि उपस्थितांसमोर का करण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी, तसेच गरज असल्यास आरक्षण सोडतीची प्रक्रिया पुन्हा राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार किशोर देशमुख यांच्याकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

आरक्षण प्रक्रियेतील हा गोंधळ लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, प्रशासनाने तातडीने खुलासा करावा अशी मागणी जोर धरत आहे.

प्रभाग क्रमांक 1मध्ये सर्व साधरण पुरुष हे आरक्षण का बदलण्यात आले या ठिकाण माजलेल्या भोकेच्या पत्ता कट सोयीनुसार करण्यात आले का?या ठिकाणी महिला आरक्षण जाहिर केले असताना निवडणूक आरक्षण कार्यक्रम जाहीर करणारे गुड याच्यावर संशयाची छाया उमटत आहे,

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us