Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»भुवनेश्वर सभागृहासाठी आलेला खासदार फंडातील निधी वळवल्याप्रकरणी ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ताज्या बातम्या

भुवनेश्वर सभागृहासाठी आलेला खासदार फंडातील निधी वळवल्याप्रकरणी ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

भुवनेश्वर सभागृहासाठी आलेला खासदार फंडातील निधी वळवल्याप्रकरणी ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

रोहा प्रतिनिधी: समीर बामुगडे

वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सभागृहासाठी मंजूर करण्यात आलेला निधी प्रत्यक्ष सभागृहाच्या बांधकामावर न वापरता थेट साई मंदिरासाठी वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राकेश शेडगे यांनी केला आहे. या प्रकरणी ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सूचक व अनुमोदन देणाऱ्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

शेडगे यांनी सांगितले की, वरसे ग्रामपंचायत हद्दीत सभागृह उभारण्यासाठी शासनाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी सभागृहावर खर्च न करता शासकीय जागेतील साई मंदिरासाठी वापरण्यात आला. यामुळे भुवनेश्वरचे सभागृह कुठे गेले, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यात आल्याचेही शेडगे यांनी नमूद केले. सभागृहाच्या कामाला मंजुरी देणारे अधिकारी या सर्व प्रकाराला जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली.

ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव करताना नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने निधीचे वाटप केल्याचा आरोप शेडगे यांनी केला. शासकीय निधीचा असा दुरुपयोग म्हणजे सामान्य जनतेशी केलेला विश्वासघात असल्याचे ते म्हणाले.

शेडगे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनीही न्यायाची मागणी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us