Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीनहार्मनी लाईफ फाऊंडेशनचा वृक्षारोपण व रोपवाटप उपक्रम उत्साहात
ताज्या बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीनहार्मनी लाईफ फाऊंडेशनचा वृक्षारोपण व रोपवाटप उपक्रम उत्साहात

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीनहार्मनी लाईफ फाऊंडेशनचा वृक्षारोपण व रोपवाटप उपक्रम उत्साहात

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रीनहार्मनी लाईफ फाऊंडेशनच्या वतीने रोठ खुर्द ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण व फळझाडांच्या रोपवाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. फाऊंडेशनचा हा पहिलाच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम असून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना “निसर्गऋणी – निसर्गाशी सुसंवादात जगण्याची जीवनशैली” अशी होती. मानव हा निसर्गाचा मालक नसून निसर्गाचा ऋणी आहे. भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे संवर्धन करून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
वाढते तापमान, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रोठ खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना विविध फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या रोपवाटपाचा लाभ ७० हून अधिक शेतकऱ्यांनी घेतला.
तसेच गाव परिसरात सुमारे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी, गावचे सरपंच सौ.गीता मोरे, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर नागरिक, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि ग्रामस्तरावर हरित भविष्य घडविण्यासाठी सामूहिक संकल्प करण्यात आला. “आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या जीवनाचे संरक्षण” हा संदेश देत उपस्थितांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ग्रीनहार्मनी लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक पटेल एम.जे. यांनी भविष्यातही पर्यावरण संवर्धन, जनजागृती आणि समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us