Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»डीएमसीसीमध्ये श्री. दत्तात्रय गोरले यांचा सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात संपन्न
ताज्या बातम्या

डीएमसीसीमध्ये श्री. दत्तात्रय गोरले यांचा सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

डीएमसीसीमध्ये श्री. दत्तात्रय गोरले यांचा सेवानिवृत्ती सत्कार उत्साहात संपन्न

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

डीएमसीसीमध्ये तब्बल ३५ वर्षे ७ महिने प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे श्री. दत्तात्रय गोरले हे दिनांक ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ व उल्लेखनीय सेवेला गौरविण्यासाठी १ जून रोजी डीएमसीसीच्या कॅन्टीन हॉलमध्ये सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. गोरले यांनी ८ ऑक्टोबर १९९० रोजी सेवेत प्रवेश केला होता. आपल्या सेवाकाळात त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा, समर्पण आणि व्यावसायिकता यांचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याचा सहकारी व अधिकारी वर्गावर सकारात्मक प्रभाव पडला आहे.
सदर निरोप समारंभासाठी एचआर हेड वाणी मॅडम, डायरेक्टर श्री. कुलदीप तिवारी, युनिट हेड श्री. किरण हिंगणे, प्रॉडक्शन मॅनेजर श्री. सुरेश ताम्हणकर श्री गोरले यांची पत्नी,दोन मुली व जावई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात श्री. गोरले यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध गुणांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कंपनीच्या विविध कार्यक्रमांमध्ये उत्साहाने व हिरिरीने सहभाग घेणे, कोणतेही काम मनापासून व जबाबदारीने पार पाडणे, तसेच प्रामाणिकपणे सेवा बजावणे या त्यांच्या गुणांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व सहकार्यशील स्वभावामुळे ते सर्वांच्या आदराचे पात्र ठरल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी श्री. गोरले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. सहकारी कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत भावपूर्ण निरोप दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. गोरले यांना शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, आनंदी व समृद्ध जावो, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us