Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम
ताज्या बातम्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम

पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” तसेच नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पनवेल येथे “स्वर संध्या” या भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

         लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव करण्यासाठी अमृत महोत्सव वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या “स्वर संध्या” या कार्यक्रमात संगीतप्रेमींसाठी दर्जेदार आणि सुरेल संगीताची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड तसेच ज्ञानेश्वरी धाडगे आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दोन्ही कलाकारांनी आपल्या गायकीच्या जोरावर अल्पावधीतच रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून त्यांच्या सादरीकरणाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कार्यक्रमाला पंडित प्रतापबुवा पाटील यांची मृदुंग साथ, प्रसाद पाध्ये यांची तबला साथ तसेच सूर्यकांत सुर्वे यांचे तालवाद्य लाभणार आहे. अनुभवी कलाकारांच्या साथसंगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. याशिवाय नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा यांच्यावतीने सुरेल भजन सादर करण्यात येणार असून गायिका शिवमाला पाटील, पखवाज वादक निलेश पाटील तसेच तबला साथीसाठी मृगेंद्र कडू हे कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके करणार आहेत. संगीत, भजन आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेल्या या अविस्मरणीय मैफलीचा लाभ रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” तसेच “नादब्रह्म साधना मंडळ खारघर” यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us