Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पोलादपूर दशानेमा गुजराती समाजाच्या पुढाकारातून सोमवारी गंगादशहरा
ताज्या बातम्या

पोलादपूर दशानेमा गुजराती समाजाच्या पुढाकारातून सोमवारी गंगादशहरा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पोलादपूर दशानेमा गुजराती समाजाच्या पुढाकारातून सोमवारी गंगादशहरा

प्रतिनिधी पोलादपूर

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ऐतिहासिक व पौराणिक शहरातील अधिक ज्येष्ठ महिना आरंभापासून गंगेचे पृथ्वीवर आगमन झाल्याची तिथी ज्येष्ठ शुद्ध गंगादशमी पर्यंत गंगापूजन सोहळा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरू राहणार आहे.
महाबळेश्वर येथे भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव हे यज्ञकर्म करण्याचा संकल्प केला. यावेळी ब्रह्मदेवाची ज्येष्ठ पत्नी सावित्री, महादेवांची पार्वती, श्रीविष्णूंची पत्नी महालक्ष्मी यज्ञकर्मासाठी सोबत बसणार हे नक्की झाले. मात्र, सावित्रीला स्त्रीसुलभ स्वभावामुळे विलंब होत असल्याचे पाहून ब्रम्हदेवांनी कनिष्ठ पत्नी गायत्री हिला यज्ञकर्मासाठी पाचारण केले. लहान सवत गायत्री यज्ञासमोर बसलेली पाहून विलंब झालेल्या सावित्रीला संताप आला. यानंतर सावित्रीने कनिष्ठ सवत गायत्रीला नाहीशी होऽ!असा शाप दिल्याने ती जमिनीत अंतर्धान पावली आणि ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेवांनी सावित्रीला समजवून तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीने महादेव, विष्णू आणि ब्रह्मदेवाला स्त्रीरुप नदीसारखे असते ते समजून घेण्यासाठी तुम्ही कोयना कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या स्वरुपात अनुभव घ्या असा शाप दिला. यावेळी विष्णू महादेवांनी सावित्रीला संताप आवरता घेण्याची विनंती केली त्यावेळी सावित्रीने मला सागराशी एकरुप होण्यापूर्वी मला रोखले तर राग शांत होईल असे सांगून नदीरुप धारण करीत सागराच्या दिशेने सावित्री निघाली. यावेळी महाबळेश्वर येथून निघालेल्या ब्रह्मदेवाची ज्येष्ठ पत्नी सावित्रीची समजूत काढण्यासाठी महादेव नंदीवर स्वार होऊन निघाले. यावेळी महादेव जिथे जिथे थांबले तिथे शंकरांच्या शिवलिंगाची मंदिराची योजना दिसून येते. पोलादपूर येथे शंकर सावित्रीच्या पुढे नंदीवरून पोहोचले त्यावेळी सावित्री किती मागे आहे हे पाहण्यासाठी त्यांनी एका डोंगराच्या पायथ्याशी जटेतील गंगा आणि नंदीला ठेवून डोंगरावर चढले. तेवढ्यात डोंगर आणि नंदी-गंगेच्या मधून सावित्री रौद्ररुप धारण करून वेगाने सवाद गावाकडे निघाली. त्यामुळे पोलादपूर येथील डोंगराला महादेवाचा डोंगर नाव पडले तेथील शिवलिंगासमोर नंदी नसून तो पोलादपूर येथील गंगा माता घाटावर होता. २००५ च्या महापूरात नंदी घाटाजवळच्या हत्ती डोहात वाहून गेला. दशानेमा गुजराती समाजाच्या पुढाकारातून येथे गंगामाता मंदिर व सभागृह उभारण्यात आले आहे. जवळच भाविकांनी सिध्देश्वर शंकर मंदिर बांधले आहे. पोलादपूरच्या एका डोंगरावर श्री काळभैरवनाथ मंदिर आहे अशी काशिक्षेत्रासारखी पौराणिक योजना निर्माण झाली.
पोलादपूर शहरातील भाविक या श्रीदेवी गंगामाता मंदिरासमोरील घाटावर रोज संध्याकाळी गंगापूजन करीत सोमवारी गंगादशमी म्हणजेच गंगेचे पृथ्वीवर आगमन झाल्याची तिथी असल्याने गंगापूजन समारोप करण्यात येणार आहे. अखेरच्या दिवसापर्यंत भाविकांनी गंगापूजनाचा लाभ घेण्याचे आवाहन दशानेमा गुजराती समाजातर्फे करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us