Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»आदिवासीकन्येची(सपना)प्रेरणादायी गगनभरारी !! *जिद्द,मेहनत आणी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालू शकतो.समाजापुढे ठेवला आदर्श.
ताज्या बातम्या

आदिवासीकन्येची(सपना)प्रेरणादायी गगनभरारी !! *जिद्द,मेहनत आणी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालू शकतो.समाजापुढे ठेवला आदर्श.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*आदिवासीकन्येची(सपना)प्रेरणादायी गगनभरारी !!
*जिद्द,मेहनत आणी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालू शकतो.समाजापुढे ठेवला आदर्श.

तळा -किशोर पितळे-

रोहा तालुक्यातील चिंचवली येथील सपना राजेश वाघमारे यांनी आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.जिध्द, आत्मविश्वास अत्यंत मेहनतीने त्यांनी रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली वकील होण्याचा बहुमान मिळवला. आता त्यांची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्विन मेरी युनिव्हर्सिटी येथे निवड झाली आहे. त्यांचे हे यश खरोखर अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. आपल्या मनात जिद्द असेल आणि मनगटात कष्ट करण्याची ताकद असेल तर आपण आभाळाला गवसणी घालू शकतो हेच सपना राजेश वाघमारे यांनी सिद्ध करून दाखवले असून समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे.सपना लहानपणापासून हुशार विद्यार्थीनी
म्हणून ओळख निर्माण केली होती.तीचा जीवनपट खडतर आहे.आई वडीलांपासून कुंटुबाला सोडून दुसरा घरोबा केला.वडिलांचे छत्र हरपले असल्याचे कळते.भाचीचा सांभाळ मामा भिवा पवार यांनी करून संपूर्ण जबाबदारी घेतली अशी माहितीमिळाली तीने माणगांव येथील दहावी पर्यंतचे शिक्षण वनवासी आश्रमाशी संलग्न वसतिगृह आणि शाळां मधून घेतल्याचेही समजते त्या नंतर पुढील शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.या समाजातील सपना वाघमारे या रोहा तालुक्यातील चिंचवली गावातील मुलीने चक्क एल एल बी केले..आणि आता त्या एल एल एम करण्यासाठी सरकारी स्कॉलरशिप मिळवून लंडन येथे जात आहेत.आदिवासी समाजातील रायगड जिल्ह्यातील एकमेव भगीनी आहे तीने जिध्द मेहनत आणी आत्मविश्वासा च्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून साकार करून दाखवले तिच्या जिध्दीला सलाम.. कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या गाण्या प्रमाणे
आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याच्या पिंजरा ।तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने ।दरी,डोंगर हिरवी राने जा ओलांडून सरीता सागरा।। असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या उज्वल यशाबद्दल तीचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us