Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल येथे “एक कृतार्थ संध्याकाळ” साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन
ताज्या बातम्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल येथे “एक कृतार्थ संध्याकाळ” साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल येथे “एक कृतार्थ संध्याकाळ” साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा आणि नवीन पनवेल शाखेच्यावतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त “एक कृतार्थ संध्याकाळ” या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.

          या कार्यक्रमात “लोकनेता” या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन, निमंत्रितांचे कवी संमेलन तसेच अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, लोकनेते रामशेठ ठाकूर, पानिपतकार ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ कवी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कोमसापचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, युवा नेते नगरसेवक परेश ठाकूर, सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रा.एल.बी.पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोमसापचे गणेश कोळी आणि संजय गुंजाळ यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us