रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
वाढत्या उन्हाळ्यामुळे सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढली असून थंड पिण्याच्या पाण्याची गरज अधिक भासत आहे. ही गरज ओळखून रोहा शहरातील दानशूर, प्रेमळ व मनमिळावू व्यक्तिमत्व तसेच हॉटेल सुरुचीचे मालक श्री. मनोहर शेठ देसाई यांनी रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी वॉटर कूलर भेट देत थंड पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करून दिली.
या सामाजिक उपक्रमामुळे आगारातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला असून मनोहर शेठ देसाई यांच्या या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी रोहा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. प्रकाश शेलार, स.वा.नी. श्री. खानापूरकर साहेब, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव तथा वाहतूक नियंत्रक श्री. गणेश शेलार, रोहा आगार सचिव श्री. बलराम जोशी तसेच रोहा आगारातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रोहा आगाराच्या वतीने श्री. मनोहर शेठ देसाई यांचे आभार मानत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतीमुळे रोहा शहरात मनोहर शेठ देसाई यांच्या कार्याबद्दल पुन्हा एकदा कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.