Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
ताज्या बातम्या

सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रोहा तालुक्यातील किल्ला गावातील रहिवासी नितेश धर्मा मुंढे यांच्या आयुष्यात लहानपणापासूनच दुःखाचे डोंगर उभे राहिले. आई-वडिलांचे छत्र लवकर हरपल्यानंतर त्यांचा सांभाळ बहिणीने केला. मात्र काळाने तिलाही आजारपण दिल्याने नितेश पुन्हा एकाकी झाले.
एकट्याने जीवन जगत असताना नितेश यांना संधिवाताचा गंभीर त्रास सुरू झाला. चालणे, बसणे आणि दैनंदिन कामे करणेही कठीण बनले. परिस्थिती अत्यंत बिकट होत गेली. मित्र परिवाराने शक्य ती मदत केली, पण गरज मोठी असल्याने सर्वांना मर्यादा येत होत्या.
अशा कठीण प्रसंगी किल्ला गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय बामुगडे यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा उदारमतवादी व्यक्तिमत्त्व श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्यापर्यंत पोहोचवली. नितेश यांच्या परिस्थितीची माहिती मिळताच प्रमोद शेठ यांनी तत्काळ स्वतः पुढाकार घेत नितेश यांच्या घरी भेट दिली.
नितेश यांची अवस्था पाहून प्रमोद शेठ यांचे मन हेलावून गेले. त्यांनी केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केला. नितेश यांच्या राहत्या घरासाठी छप्पर, घराला रंगकाम, बेड, फॅन, वॉटर प्युरिफायर तसेच रोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली.
इतकेच नव्हे तर मदतीची सुरुवात म्हणून त्यांनी तत्काळ ₹40,000 गुगल पे द्वारे नितेश यांच्या खात्यावर जमा करून दिले. गावातील उपस्थित तरुण मंडळी आणि ग्रामस्थ हे सर्व पाहून भारावून गेले. “आजच्या काळात असा दानशूर माणूस क्वचितच पाहायला मिळतो,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
प्रमोद शेठ म्हसकर यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे नितेश मुंढे यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. त्यांच्या या मानवतावादी कार्याबद्दल किल्ला ग्रामस्थांकडून त्यांना शतशः नमन करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us