रायगडातील दानशूर व्यक्तिमत्व प्रमोद शेठ म्हसकर व राजकारणातील डॅशिंग नेतृत्व पंचायत समिती सदस्य सुरेश जी मगर पुरस्कृत.
१ मे रोजी महादेववाडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार. बैलगाडा प्रेमींची उत्सुकता शिगेला.
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
अगदी तरुण वयात समाजासाठी धडपडणारे सामाजिक कला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात प्रत्येक घराघरात नाव पोहचलेले एक दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक प्रमोद शेठ म्हसकर तसेच राजकारणातील निर्भीड डॅशिंग नेतृत्व पंचायत समिती सदस्य सुरेश जी मगर यांच्या सौजन्याने बैलगाडा प्रेमी करिता भव्य दिव्य अशा बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेचा थरार पाहण्याकरता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सदर स्पर्धेची तयारी सचिन सुतार गणेश सुतार, राजेंद्र सुतार ग्रामस्थ व मित्र मंडळ महादेववाडी करीत आहेत.
१ मे या महाराष्ट्र दिनी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रोहा तालुक्यामध्ये बैलगाडा स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक हौशी शेतकरी व बैलगाडा प्रेमींनी मोठ मोठ्या किमतीचे बैल शर्यतीसाठी घेतले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाशी निगडित ही स्पर्धा असल्याने ही स्पर्धा पाहण्यासाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित राहतात.
प्रमोद शेठ म्हसकर यांनी कोलाडात भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या त्यावेळी हौशी बैलगाडा प्रेमींच्या आग्रहाखातर बकासुर याला त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते. बकासुरला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. त्याचवेळी हौशी बैलगाडा स्पर्धकांनी शेठ तुम्ही स्पर्धा भरवा आणि आम्हाला वाव द्या अशी मागणी प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडे केली होती.
त्यामुळे गणेश सुतार व त्यांचे सर्व मित्रमंडळी महादेव वाडी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. याकरता रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेशजी मगर त्यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक अथक परिश्रम घेत आहेत.


