तळा वडाची वाडी (मोहिते आळी)येथे सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा.
तळा-किशोर पितळे- तळा वडाची वाडी (मोहिते आळी)येथे सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा २९ एप्रिल २६ रोजी शिवसेना शहर प्रमुख राकेश शेठ वडके यांच्या हस्ते फित कापून व तालुका प्रमुख प्रध्दुम्न ठसाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा कोअर कमेटी सदस्य नगरसेवक लिलाधर खातू,युवासेना उप जिल्हा प्रमुख नगरसेवक रितेश मुंढे नगरसेवक नरेश सुर्वे नगरसेवक सिराज खाचे नगरसेवक मंगेश पोळेकर उपतालुका प्रमुख रमेश तादंळेकर युवासेना शहरप्रमुख समीर शिर्के उपशहरप्रमुख महेंद्र महाडकर विलास तळेकर श्री विठोबा चांडिवकर शिवसैनिक सिध्देश राणे सुरेश शिंदे अतुल क्षीरसागर नितीन बाईत व इतर शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व मुंबईकर मंडळ उपस्थितीत होते राज्याचे फलोत्पादन रोजगार मंत्री ना.भरतशेठ गोगावलेयांच्यामाध्यमातून सामाजिक सभागृह बांधकामाला १२ लक्ष रु. निधी उपलब्ध करून दिला होता या वाडीतील ग्रामस्थांनी सामाजिक सभागृहाची मागणी केल्या प्रमाणे पुर्ण झाली आहे. त्यामुळे शुभ धार्मिक कार्य लग्न विधी सोहळा साजरे होतील सामाजिक सभागृहाची कमतरता पुर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


