आंबेवाडी कोलाड नाक्यावर खासदार सुनील तटकरेंच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन, नागरिकांना लवकरच सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार.
कोलाड (श्याम लोखंडे) रायगडचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या कुशल विकासाच्या मार्गदर्शनातून तसेच ना.मंत्री अदितीताई तटकरे मा.आमदार तथा युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून कोलाड नाक्यावरील आंबेवाडी ग्राम पंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले.
रोहा तालुक्यातील तसेच मुंबई गोवा महामार्गालगत असलेली नामवंत आंबेवाडी ग्राम पंचायत हद्दीत आता जोरदार विकास कामांचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी ग्रामपंचायत आंबेवाडी, येथे पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सन २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडला.

लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आणि मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमानिमित्ताने यावेळी युवा नेते अनिकेतभाई तटकरे, जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण,आणि महिला व बाळ विकास सभापती निधी नरेंद्र जाधव,रोहा पंचायत समिती सभापती विजयाताई विनोदभाऊ पाशिलकर, उपसभापती संजय मांडुळस्कर,सदस्य जगन्नाथ धनावडे,युवा नेते राकेशशेठ शिंदे, नरेंद्रशेठ जाधव, रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, रामचंद्र चितळकर, नारायणराव धनवी, मनोज शिर्के,गणेश वाचकवडे,महेश वाचकवडे, राजेश कदम, संजय राजिवले, श्रीकांत चव्हाण, दया पवार,अविनाश पलंगे, कुमार लोखंडे, प्रमोद लोखंडे, उत्तम बाईत, शैलेश सानप,संतोष बाईत,सह ग्राम पंचायतीचे सर्व पदाधिकारी परिसरातील पक्षाचे सरपंच उपसरपंच पक्षाचे कार्यकर्ते तसेच कोलाड आंबेवाडी नाक्यावरील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी,आंबेवाडी गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आदी आंबेवाडी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या भूमिपूजन कार्यक्रमात यावेळी ग्रामपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत, नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र कक्ष, सार्वजनिक रस्त्यांचे बांधकाम व सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी नाले बांधकाम तसेच संरक्षण भिंत उभारणी, आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सामाजिक सभागृह अशा महत्त्वपूर्ण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याच बरोबर ग्राम पंचायत विकास कामांना एक कोटींची आणि सार्व.गणेश उत्सव मंडळ सभागृसाठी एक कोटींची निधीची तरतूद या विकास कामांसाठी करण्यात आली असून अशी तब्बल दोन कोटी रुपयांची विकास कामे येत्या काळात पूर्ण होणार असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिक सक्षम होईल, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा सहजपणे उपलब्ध होतील आणि आंबेवाडीच्या सर्वांगीण विकासाला नवी गती आणि अधिक चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांशी संवाद साधताना लोकप्रिय खासदार खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.


