Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»**रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा भव्य सत्कार*
ताज्या बातम्या

**रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा भव्य सत्कार*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 12, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter

*रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा भव्य सत्कार*

*तळा (किशोर पितळे)*रायगड निवासी शिक्षक संघ, तळा यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ गायमुख येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी संघाचे अध्यक्ष अमिष भौड होते.
कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष कमळाकर चोरगे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी विजययेलवे,भानूमंचेकर,महेंद्रदेवरूसकर, राजेंद्र कुडेकर,सुनील बयकर, प्रिया गायकवाड, मितल वावेकर,संदीप खैरे, संदीप जामकर,अनंत वारे, दीपक ठाकूर,अनंत पालवणकर, शांताराम नटे, किशोरशास्त्री आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक, आयडॉल शिक्षक, राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले शिक्षक तसेच नवोदय व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये दीपक महादेव ठाकूर (केंद्रप्रमुख, टोकार्डे) व अनंत सिताराम पालवणकर (मुख्याध्यापक, विचुंबे) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.राज्यस्तरीय व विभागीय ऑलिम्पियाड,विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्यांमध्ये श्रीम.मितल सुहास वावेकर, रत्नाकर तुकाराम पाटील, सुनील गोविंद बयकर, अविनाश रमेश जाधव, विकास भीमराव राठोड, सचिन धोंडीराम चव्हाण, सुरेखा मारुती तांबट तसेच चेतन मधुकर बांगर यांचा सन्मान करण्यात आला.आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्रीमती उल्का उमाजी माडेकर, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारासाठी श्रीमती सुप्रिया संदीप जामकर, गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी लियाकत अब्दुल रहेमान राऊत व श्रीमती रेश्मा रामदास तळकर तसेच आदर्श शिक्षक म्हणून श्रीमती प्रिया रमेश गायकवाड यांना गौरविण्यात आले.या शिवाय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून श्रीमती स्नेहल सुनील बयकर यांचा सन्मान करण्यात आला.शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अंतर्गत रा.जि.प. शाळा गायमुख (परसबाग) तसेच ‘सुपर निपुण शाळा’ म्हणून रा.जि.प. शाळा मालाठेवाडी यांचा गौरव करण्यात आला.नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रा.जि.प. शाळा तळे मराठी येथील श्रावणी दळवी, रुद्र थिटेकर, प्रज्वल गपाट; रा.जि.प. शाळा गायमुख येथील स्मरण पाटील; तसेच रा.जि.प. शाळा गौळवाडी काकडशेत येथील सार्थक जाधव यांचा समावेश होता. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये अथर्व फडके, प्रांजल ढाकणे, काव्या कांबळेकर, भावेश गोळे, तन्मय पवार, भक्ती रायफळे व अष्टमी पतारे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सर्व सत्कार मूर्तींना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रायगड निवासी शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. गेली १४ वर्षे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे संघाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप करताना अध्यक्ष अमिष भौड यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे संघटना दिवसेंदिवस प्रगती करत असून भविष्यातही विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्टरीत्या पार पडल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.अत्यंत खेळीमेळीचेवातावरणात समारंभ पार पडला

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us