Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ,सुंदर बस स्थानक अभियान!,तळा बसस्थानकाला कमिटीची भेट.
ताज्या बातम्या

*’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ,सुंदर बस स्थानक अभियान!,तळा बसस्थानकाला कमिटीची भेट.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 4, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ,सुंदर बस स्थानक अभियान!,तळा बसस्थानकाला कमिटीची भेट.
*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आयोजन.
तळा -किशोर पितळे-स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेयांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येत असून अभियानाची अमंलबजावणी प्रत्येक विभागात केली जात असून मध्यवर्ती कार्यालयाकडून दि.३एप्रिल२६रोजी पालघर विभागाकडून तळा बस स्थानकात विभाग नियंत्रक कैलास पाटील विभागीय कर्मचारी वर्गअधिकारी विजय पवार समवेत रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांनी येऊन पहाणी केली.यावेळी जेष्ठ पत्रकार किशोर पितळे प्रवासी मित्र प्रतिनिधी जनार्दन वडके वाहतूक नियंत्रक श्री वारगुडे उपस्थित होते यावेळी स्पर्धात्मक अहवाल भरून घेण्यात आला. कोरोना संकट व त्यानंतर एस् टी कर्मचाऱ्यांचा पाच महिने (दिर्घकाळ) चाललेला संप यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आणि राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.मात्र दोन वर्षभरा पासून एसटी महामंडळाने पुन्हा एकदा एस टी चा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज्यात १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीसे देवून गौरविण्यात येणार आहे.या अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळा मध्ये मध्यवर्ती स्तर व विभागीय स्तर अशा दोन समित्या स्थापन केल्या जातात.स्वच्छता अभियानाचा आराखडा तयार करणे,मुल्यांकनासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करणे, अभियानाचे सर्व्हेक्षण करून योग्य बदलांसह मार्गदर्शन करणे ही या समितीची कार्यकक्षा आहे.महामंडळाच्या सर्व स्थानकांचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढउतार, बस स्थानक, बसफेऱ्यांची संख्या समान नाही,अर्थात सर्वांना समान संधी मिळण्यासाठी काही निकषांच्या आधारे बसस्थानकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.त्या विभागातील ज्येष्ठ पत्रकार, प्रवासी मित्र संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. विभागस्तरावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. त्यात विभागीय स्थापत्य अभियंता, उपयंत्र अभियंता, विभागीय कामगार अधिकारी, त्यामुळे या निमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विशद करताना,सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक,टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. असे स्पष्ट केले होते.-तसेच ” आपलं गाव, आपलं बसस्थानक ” या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बस स्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

महामंडळाच्या ६ प्रदेशामध्ये प्रत्येकी ९ याप्रमाणे प्रादेशिक स्तरावर ५४ बसस्थानके पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. एकूण गुणांच्या ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त बस स्थानकांचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.विजेत्या बसस्थानकांना अडीच कोटींची बक्षीसे !प्रादेशिक स्तरावर अ वर्ग बसस्थानक प्रथम क्रमांक रुपये १० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५ लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, ब वर्ग प्रथम रूपये ५ लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय १.५० लाख व प्रशस्तीपत्र, क वर्ग बसस्थानक प्रथम १ लाख चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५० हजार व प्रशस्तीपत्र, तृतीय २५ हजार व प्रशस्तीपत्र. राज्यस्तरावर विजेत्या बसस्थानकाच्या पारितोषिकाची रक्कम अ वर्ग प्रथम क्रमांक रूपये ५० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, ब वर्ग प्रथम क्रमांक रुपये २५ लाख चषक व प्रशस्तीपत्र आणि क वर्ग प्रथम क्रमांक रूपये १० लाख चषक व प्रशस्तीपत्र येणार आहे.तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us