Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जय बजरंग रोहा कबड्डी संघाच्या राज मोरेची दमदार झेप; राज्य निवड चाचणीसाठी सलग दुसऱ्यांदा रायगड संघात निवड
ताज्या बातम्या

जय बजरंग रोहा कबड्डी संघाच्या राज मोरेची दमदार झेप; राज्य निवड चाचणीसाठी सलग दुसऱ्यांदा रायगड संघात निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जय बजरंग रोहा कबड्डी संघाच्या राज मोरेची दमदार झेप; राज्य निवड चाचणीसाठी सलग दुसऱ्यांदा रायगड संघात निवड

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

जय बजरंग रोहा कबड्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू राज ज्ञानेश्वर मोरे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुन्हा एकदा राज्य पातळीवर झेप घेतली आहे. त्याची सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य निवड चाचणीसाठी रायगड जिल्हा संघात निवड झाल्याने क्रीडाविश्वात त्याचे कौतुक होत आहे.
राज मोरे याची क्रीडा वाटचाल सातत्यपूर्ण यशाने उजळलेली आहे. सन 2020 मध्ये किशोर गटात त्याने जय बजरंग रोहा संघाला रायगड जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर कुमार गटात कर्णधार म्हणून दोन वेळा संघाला विजेतेपद मिळवून देत त्याने आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडली.
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत 2025 मध्ये रायगड जिल्हा कुमार गट संघाच्या कर्णधारपदी त्याची निवड करण्यात आली. पुढे महाराष्ट्र कुमार गट संघात स्थान मिळवत त्याने राज्य पातळीवरही आपली छाप उमटवली.
नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतही राज मोरेने प्रभावी खेळ सादर केला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची प्रथम ४० खेळाडूंमध्ये निवड झाली आणि त्यानंतर अंतिम २२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवत जिल्हा सराव शिबिरासाठी तो पात्र ठरला.
आता नाशिक येथे दि. 2 एप्रिल ते 6 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या 73 व्या वरिष्ठ गट पुरुष कबड्डी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघात त्याची निवड झाली आहे.
राज मोरे याची ही यशस्वी वाटचाल मेहनत, शिस्त आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण ठरली असून जय बजरंग रोहा संघ व रोहा तालुक्याचा अभिमान अधिक उंचावला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us