मनमिळावू स्वभावाच्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे निधन; परिसरात हळहळ
प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा
मनमिळावू व आपलासा करणारा स्वभाव म्हणून ओळख असलेल्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दि. २६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. सुर्वे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सून, जावई तसेच नातू-नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या प्रेमळ व जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
त्यांची अंत्ययात्रा दि. २७ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता साई छाया सोसायटी, बँक ऑफ इंडिया जवळ, रेवदंडा येथून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वत्र व्यक्त होत आहे.


