Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या ऐतिहासिक स्वयंभू महादेवाची यात्रा, हजारोंच्या संख्येने भक्तगण यात्रेत दाखल,जत्तर काठ्यांचे वाजत गाजत स्वागत,मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती.
ताज्या बातम्या

रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या ऐतिहासिक स्वयंभू महादेवाची यात्रा, हजारोंच्या संख्येने भक्तगण यात्रेत दाखल,जत्तर काठ्यांचे वाजत गाजत स्वागत,मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या ऐतिहासिक स्वयंभू महादेवाची यात्रा, हजारोंच्या संख्येने भक्तगण यात्रेत दाखल,जत्तर काठ्यांचे वाजत गाजत स्वागत,मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती.

कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या श्री क्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा २६ ते २७ मार्च रोजी साजरा होत आहे. या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पध्दतीने कार्यक्रम होतात. तर सदरच्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपपला व्यवसाय थाटून व्यवसायासाठी सज्ज आहेत. यात्रेतील वैशिष्टय म्हणजे चिंबोरीचे कालवणासाठी त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री मागील दोन दिवस झाली असल्याचे समजते. तर गुरुवारी रात्रौ बारा वाजता शंभू महादेवाचे धार्मिक तथा आध्यात्मिक विधिवत पद्धतीने विवाह सोहल्यासाठी मानाच्या देव काट्या व जत्तर काठ्या यांचे आगमन मोठ्या थाटामाटात वाजत गाजत झाले आहे.त्याच बरोबर यात्रेकरूंची देखील अलोट गर्दी दिसून येत होती.

बुधवारी आणि गुरुवारी दिवसभर देवाचे विविधवत पद्धतीने धार्मिक कार्यक्रम पार पडले तर रात्रीचा शंभू महादेवाचा लग्न सोहळा पाहण्यासाठी अथवा त्याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील तळा, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यासह विविध ठिकाणाहून तर विशेषतः ग्रामीण भागातून भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शनासाठी दाखल झाले असून कोळी बांधव यांच्या कडून विशेषतः येथे तर बहुसंख्येने कोळी बांधव यावेळी खाऱ्या पाण्यातील चिंबोरीचा व्यवसाय करण्यासाठी एक दोन दिवस आधीच येऊन विक्री करतात. यात्रा म्हणून बुधवार पासून या ठिकाणी लहान मुलांची खेळणी व विविध प्रकारचे छोटे मोठे विविध प्रकाचे दुकानदार येऊन बसले आहेत. या यात्रेत प्रामुख्याने संपन्न होत असलेले महादेवाच्या विवाहाचे सर्व धार्मिकविधी, मानपान बहुजन समाजाद्वारे आजही त्यांच्या चालीरीतीप्रमाणे केले जात आहेत. तसेच रामनवमीच्या दिवशी मोठे आगळे वेगळे स्वरूप म्हणजे यात जत्रेच्या विविध प्रकारे सजविलेल्या देव काठ्या हे या यात्रेचे आकर्षण म्हणून ओळखले जात असून यासाठी तसेच शंभू महादेवाचा विवाह सोहळा प्रीत्यर्थ मानाच्या जत्तर काठ्यांचे आगमन तसेच व यात्रेत येणारे यात्रेकरू कोळी बांधव यांचे वाजत गाजत आगमन रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.आणि देवाचे भक्त महादेववाडीच्या सुतारांची गळाभेट घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने यात्रेकरू आजही पायी दिंडी पदयात्रा करत हर हर महादेवाचे गजर करत या ठिकाणी या सोहळ्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी येतात.


रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या ऐतिहासिक स्वयंभू महादेवाची यात्रा, हजारोंच्या संख्येने भक्तगण यात्रेत दाखल,जत्तर काठ्यांचे वाजत गाजत स्वागत,मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती.
सदरच्या या धार्मिक तथा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या यात्राउत्सवाला महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी गुरुवारी सायंकाळी सदिच्छा भेट देत श्री शिवशंभू महादेवाचे दर्शन घेतले त्याच बरोबर कोळी बांधवांच्या आलेल्या जत्तर काठ्यांचे स्वागत तसेच त्यांचे मान देऊन त्यांच्या शुभ हस्ते जत्तर काठ्या सोडण्यात शुभारंभ केले व या काठ्या मंदिराच्या महाद्वारी वाजत गाजत नेण्यात आल्या.यात्रेकरूंना या उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, संदीप तटकरे,उप सभापती संजय मांडुळस्कर,पंचायत समिती सदस्य सुरेश मगर,तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर,विजयराव मोरे, मनोज कुमार शिंदे,शंकर भगत,अनिल भगत, जयवंत मुंढे,संदेश मोरे, हरिश्चंद्र माने,ज्ञानेश्वर साळुंखे,विठ्ठल मोरे, दत्ता चव्हाण,संतोष माने, दिनेश भगत,सतीश भगत, अरविंद मगर,अमित मोहिते, हरिश्चंद्र मोरे, ज्ञानेश्वर दळवी,दगडू बामुगडे, काठीचे मानकरी सौ. दीपिका भगत, ग्राम पंचायत सरपंच नथुराम माने सह ग्राम पंचायत सदस्य, तसेच आदी कोळी बांधव तसेच यात्रेकरू आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थीत होते.

रोहा-तळाघर येथील बारा बलुतेदारांची स्वयंभू महादेवाची यात्रा जिल्ह्याभरातून भाविकांची होणारी गर्दी; यात्रेत पारंपारिक पद्धतीने महादेवाचे लग्न, छबिना विधी असा विवाह सोहळा दोन दिवस हा पारंपारिक रंगतो. या सर्व प्रथा-परंपरा पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे भाविकांची महाराष्ट्रभरातून तसेच रायगड जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातीन भक्तगण भाविक प्रचंड प्रमाणात आनंद सोहळा तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत असतात तर या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असते.

यात्रेसाठी तसेच श्री शंभू महादेवाचे लग्न सोहळ्यासाठी मंदिर परिसर कणा रांगोळी आणि फुलांनी तसेच विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.यात्रा यशस्वी करण्यासाठी धाटाव, तळाघर, महादेववाडी, लांढर, वाशी, बोरघर, भुवनेश्वर, निवी, वरसे, रोठखुर्द, रोठ बुद्रुक, उडदवणे, किल्ला त्याचबरोबर विविध गावचे सरपंच, सदस्य, तळाघर ग्रामस्थ, पंचक्रोशी, तसेच यात्रा समिती अत्यंत तळमळीने व आध्यात्मिक भावनेने परिश्रम घेत आहेत.तसेच प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस यंत्रणा देखील कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज झालेली असते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us