रिलायन्स फाउंडेशन व रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनतर्फे २४ गावांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान
नागोठणे प्रतिनिधी
रिलायन्स फाउंडेशन व रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत परिसरातील ९ ग्रामपंचायतींमधील २४ गावांमध्ये व्यापक स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानांतर्गत ग्रामस्तरावरील स्वच्छता सुविधा, सार्वजनिक परिसर आणि समुदाय स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. अभियानादरम्यान १४० जिल्हा परिषद शाळा व समुदाय शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच ८,३४६ चौ. मीटर क्षेत्रात गवत कापणी व परिसर स्वच्छता करण्यात आली.
गावांमधील सार्वजनिक स्वच्छता अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने १.३ किलोमीटर लांबीचे समुदाय नाले व गटारे सखोल स्वच्छ करून सुरळीत करण्यात आले. याशिवाय १० ठिकाणांहून सुमारे ३६ टन साचलेल्या समुदाय कचऱ्याची उचल करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
अभियानाच्या अंतिम टप्प्यात २४ गावांमध्ये रिलायन्सच्या वेगवेगळ्या विभागामधून कर्मचारी स्वयंसेवकांच्या सहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ५३० किलो कचरा संकलित करण्यात आला. यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छता, सार्वजनिक परिसराची निगा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमामुळे गावांमधील स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा करण्यासोबतच सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीला चालना मिळाली. कर्मचारी स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामस्तरावरील लोकसहभाग अधिक बळकट करण्यासही मदत झाली.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ आणि निरोगी ग्रामपरिसराच्या निर्मितीसाठी रिलायन्स फाउंडेशन व रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा CSR उपक्रम ‘स्वच्छ भारत – विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठण्याचे प्रेसिडेंट शशांक गोयल, कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंटचे अनिल डांगी, रमेश धनावडे, प्रसनजीत दास, अविनाश कदम, नाईसा जाकोब, सिद्धेश सोनटक्के, हरीश घासे, तसेच सर्व कॅड डिपार्टमेंट त्याचप्रमाणे सीएसआर विभागाचे रॉयस्टन सैरिओ, वरदा कुलकर्णी, सर्व प्लांट विभाग प्रमुख सचिन भागवत, निलेश दांडेकर, ब्रजेश साहू, सुजित गोराई, फेलिक्स, अनंत नारायण सतपथी, नेत्रानंद स्वाईन, कौशिक चक्रवर्ती, अजिंक्य पाटील, प्रेरक त्रिवेदी, रवींद्र मांडे, महेश राठोड, राहुल नारखेडे, मकरंद फडणीस, शिवाजी तोंडारे, सौरभ मल्ल, निखिल सोणकर, श्रीनिवास रेड्डी, वैभव बिडकर, श्रीकांत गोडबोले, शरद गायकवाड, गोपाळ शुक्ला, विवेकानंद के, सर्व एच आर बीपी, जीइटी, विविध विभागामधील इंजिनियर्स सफाई कर्मचारी एसएचजी ग्रुप असे जवळपास 400 एम्प्लॉई कार्यरत होते. रिलायन्स व्यवस्थापनाने आसपासच्या समाजासाठी केलेल्या या कार्यासाठी या परिसरातील अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.