ज्येष्ठांच्या सहवासात सानिकाचा वाढदिवस; सामाजिक बांधिलकीची जपली अनोखी परंपरा
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील ज्येष्ठांसोबत साजरा करण्याचा आदर्श रोहा तालुक्यातील शिवसमर्थ महादेववाडी येथील सानिका मोहिते हिने घालून दिला. मलखंडवाडी येथील कालकाई वृद्धाश्रमात सानिकाचा वाढदिवस ज्येष्ठांच्या सहवासात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सानिकाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच ज्येष्ठांना खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवसाचा आनंद साजरा केला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील वातावरण आनंदमय झाले.
यावेळी पत्रकार जितेंद्र जाधव यांनी सानिकाच्या उपक्रमाचे कौतुक केले. आई-वडिलांचे संस्कार आणि ज्ञानाची जोड मिळाल्याने सानिकाने आपल्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनीही आपल्या विशेष दिवसांना सामाजिक उपक्रमांची जोड देऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत वाढदिवस साजरा करण्याच्या सानिकाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी सुनंदा मोहिते, हर्षाली मोहिते, जयेश मोहिते, रितेश बारस्कर, आर्यन जंगम यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.