जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
तळा-किशोर पितळे
१आँक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिन गोरेगांव रायगड येथे साजरा होणार असून सदर दिन हा घरडा केमिकल्स लि.प्रायोजित आय एल सी आय,इंटरनँशनल लाँगव्हिटी सेंटर इंडिया (आंतरराष्ट्रीय दिर्घायुष्य केंद्र भारत (पुणा) संस्था यांच्या सौजन्याने, रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाची समन्वय समिती यांच्या सहकार्याने रुक्मिणी बेन नथुराम शेठ मंगल कार्यालय गोरेगांव रायगड येथे सकाळी १०ते दुपारी ४वाजे पर्यंत साजरा होत आहे. सदर स्नेह मेळावा (आनंदमेळावा) मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा केला जाणार आहे. चहा, नाश्ता, भोजन, चहा अशी सोय केली आहे या आनंददायी सोहळ्यात जिल्ह्यातील ६५ संघटना सहभागी होणार आहेत.अशी रायगड जिल्हा समन्वयक समीती अध्यक्ष सुरेश पालक यांनी दिली या आनंददायी कार्यक्रमाला
प्रमुख अतिथी व मार्गदर्शन मा.अरुण माधव रोडे जेष्ठ नागरिक कायदा आणी विल यावर मार्गदर्शन करणार आहेत जेष्ठ नागरिकांसाठी विविध कला क्रीडा, साहित्यिक स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे जेष्ठ नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्यातील उत्साह कायम वाढत रहावा या उदात्त हेतूने उपक्रम हाती घेतलाआहेयामध्ये कथाकथन वात्रटिका,एकपात्री नाटक, हास्यविनोद, वेशभूषा,समुह गान वैयक्तीक गाणे अशा विविध प्रकारच्या कला सादर केले जाणारअसून प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे.जे सहभाग घेणार असतील त्यांनी नावे नोंदणी करावी प्रत्येकांना टाईम १० मिनिटे वेळ दिला जाईल व नंबरा प्रमाणे सादरीकरण होईल.जेष्ठ नागरीकाप्रती आदर सन्मान, आपुलकीची भावना निर्माण व्हावी आणी विरुगुंळा मिळुनआनंद लुटता यावा या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याचे पुणा संस्थेचे प्रोग्राम आँफिसर सुशांत सोनावणे यांनी सांगितले आहे.