Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*तळ्याच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात भरारी.कु.एकता ठक्कर ने स्वप्न केले साकार. *संभाजीनगर येथे पदवी प्रदान सोहळ्यात बी.एस्सी. नर्सिंगची पदवी;
ताज्या बातम्या

*तळ्याच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात भरारी.कु.एकता ठक्कर ने स्वप्न केले साकार. *संभाजीनगर येथे पदवी प्रदान सोहळ्यात बी.एस्सी. नर्सिंगची पदवी;

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 27, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*तळ्याच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात भरारी.कु.एकता ठक्कर ने स्वप्न केले साकार.
*संभाजीनगर येथे पदवी प्रदान सोहळ्यात बी.एस्सी. नर्सिंगची पदवी;

तळा : किशोर पितळे:(प्रतिनिधी)

रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण डोगंराळ भागात अनेक हिरे जन्माला आले आहेत राजकीय, सामाजिक,क्रीडा ऐतिहासिक, शैक्षणिक क्षेत्रात नांव लौकिक प्राप्त केला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात देखील शैक्षणिक दृष्ट्या काकणभर सरस प्रगतीचा आलेख वाढतो आहे.आर्थिक पाठबळ असून काहीजण वेगळे क्षेत्र निवडतात तर काही जण जागेपणी बघीतलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.आणी आई वडील मुलांच्या स्वप्नाला बळकटी देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही आर्थिक पाठबळ देतात.तळा येथील एकता हर्षद ठक्कर हिने बी.एस्सी. नर्सिंग या वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. संभाजीनगर येथे झालेल्या पदवी प्रदान कार्यक्रमात तिला बी.एस्सी. नर्सिंगची पदवी प्रदान करण्यात आली.तिच्या या यशामुळे ठक्कर कुटुंबासह तळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.कु.एकता लहानपणा पासूनच अभ्यासू व हुशार विद्यार्थिनी होती.तिचे प्राथमिक,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण एस एस निकम इंग्लिश मिडीयम स्कूल तळा येथेच झाले. तळ्यासारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून शिक्षण घेत तिने नवी मुंबई येथील एम.जी.एम. कॉलेज ऑफ नर्सिंग येथे बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले.सन २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत तिने महाविद्यालयीन शिक्षणासोबत संलग्न रुग्णालयातील प्रशिक्षणही पूर्ण केले. परिचारिका हे आरोग्यसेवेतील महत्त्वाचे क्षेत्र असून, या क्षेत्रातील पदवी प्राप्त करून एकताने आपल्या कुटुंबासह तळा गावाचे नाव उंचावले आहे. संभाजीनगर येथे झालेल्या पदवी प्रदान सोहळ्यात पदवी स्वीकारताना तिच्या चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाची यशस्वी सांगता झाली.एकताच्या शैक्षणिक वाटचालीत वडील हर्षद ठक्कर,आई हिरल ठक्कर तसेच भाऊ हेमील ठक्कर यांचे मोठे योगदान आहे. तिच्या शिक्षणासाठी कुटुंबाने घेतलेल्या मेहनतीचे चीज करत एकताने बी.एस्सी. नर्सिंगची पदवी मिळवली असून, आपल्या कुटुंबाचे आणि तळा गावाचे नाव लौकिकास नेले आहे.
ग्रामीण भागातून शिक्षण घेत वैद्यकीय क्षेत्रात पदवी मिळवणाऱ्या एकताच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. कु एकता शी संपर्क साधला असता युवा पिढीने उद्घीष्ठ मेहनत जिध्द असेल तर यश लांब नसते.
तळ्या सारख्या भागात शैक्षणीक दालने झाल्यामुळे युवा पिढीने उच्च शिक्षण घ्यावे.उच्च शिक्षण हि काळाची गरज झाली असून बदलत्या वेगवेगळ्या क्षेत्रात नांव कमवावे असे सांगितले तीच्या या यशामुळे तळ्यातील विद्यार्थ्यांसमोर उच्च शिक्षणासाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. हे एकताने आपल्या जिध्दीतून दाखवून दिले आहे.कु.एकताच्यापुढील शैक्षणिक,व्यावसायिक वाटचालीसाठी कुटुंबीय,मित्रपरिवार आणि तळा परिसरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us