रायगड जिल्हा आंतरशालेय हँडबॉल स्पर्धेत ग्रेगोरियन स्कूल चा दबदबा
अंडर-१७ मुलांच्या संघाचे विजेतेपद; मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
MDN International School, कोलाड येथे आयोजित रायगड जिल्हा आंतरशालेय हँडबॉल स्पर्धेत ग्रेगोरियन पब्लिक स्कूल, रोहा यांच्या अंडर-१७ मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
अर्णव सलागरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. खेळाडूंच्या या यशामागे प्रशिक्षक श्री. सुधीर जंगम यांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची मेहनत महत्त्वाची ठरली.
या विजयानंतर ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या संघाची २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धेत संघ रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य फादर ॲलेन यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रेगोरियन पब्लिक स्कूल, रोहा यांच्या क्रीडा क्षेत्रातील या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.