Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा तालुक्यात भक्तिभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची सांगता ढोल-ताशांचा गजर, लेझीम-कोळी नृत्याची रंगत; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप
ताज्या बातम्या

रोहा तालुक्यात भक्तिभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची सांगता ढोल-ताशांचा गजर, लेझीम-कोळी नृत्याची रंगत; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा तालुक्यात भक्तिभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची सांगता

ढोल-ताशांचा गजर, लेझीम-कोळी नृत्याची रंगत; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा तालुक्यात गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाली. रोहा शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये गणरायाच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक तसेच सांस्कृतिक पद्धतीने काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, सनईचे मंगल सूर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
विसर्जनापूर्वी भाविकांनी गणरायाची विधिवत पूजा-अर्चा व आरती केली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. रोहा शहरातील गणेशमूर्तींचे कुंडलिका नदी, पकटी तसेच अष्टमी-करांनी नदी परिसरात विसर्जन करण्यात आले. वरसे, रोठ आणि उडवणे येथील गणेशमूर्तींचे पालदाद पुलाजवळ नदीत विसर्जन करण्यात आले. पडम, खारापटी आणि नीडी येथील नागरिकांनीही नाचत-गाजत उत्साहपूर्ण मिरवणुका काढून गणरायाला निरोप दिला.
मिरवणुकांमध्ये तरुणाईचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. तरुण-तरुणींनी लेझीम, कोळी नृत्य तसेच विविध सांस्कृतिक व पारंपरिक कला सादर करून वातावरणात रंगत भरली. अनेक ठिकाणी महिलांनीही पारंपरिक पद्धतीने नाच-गाण्यात सहभागी होत बाप्पाला निरोप दिला. फुलांची उधळण, गुलाल आणि भक्तिमय जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना अनेक भाविक भावूक झाले. आनंद, उत्साह, भक्ती आणि विरहाच्या भावनेने भारलेल्या वातावरणात रोहा तालुक्यातील गणेशोत्सवाची भक्तिमय सांगता झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us