Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»संभे गावात आजही सार्व.उत्सव काळात जोपासला जातो सारिपाटचा खेळ, परंपरा कायम.
ताज्या बातम्या

संभे गावात आजही सार्व.उत्सव काळात जोपासला जातो सारिपाटचा खेळ, परंपरा कायम.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

संभे गावात आजही सार्व.उत्सव काळात जोपासला जातो सारिपाटचा खेळ, परंपरा कायम.

कोलाड (श्याम लोखंडे )

पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व समजला जाणारा तसेच महाभारताशी जोडला गेलेला सारीपाट खेळाचा डाव आजही ग्रामीण भागात विशेषतः सार्व. उत्सव काळात खेळला जात आहे.आधुनिक काळात गणपती उत्सवातील अनेक पारंपारीक खेळ इंटरनेट मोबाईल युट्यूब इंस्टाग्रामध्ये लोप पावत असतांना दिसत आहेत. परंतु रोहा तालुक्यातील तसेच कुणबी समाज नेते माजी आमदार कै.पा.रा. सानप. यांच्या संभे गावात आजही या पारंपरिक खेळाची परंपरा पिढ्यानं पिढ्यापासून सुरु असणारा सारिपाटचा खेळ अजून ही टिकून ठेवला असल्याचे सार्व.उत्सव काळात दिसून येत आहे. हा खेळ गणेश उत्सवापासून नवरात्रौउत्सव दसऱ्या पर्यंत खेळाला जात असून कोजागिरी पौर्णिमेला या खेळाची समाप्ती केली जाते.त्यामुळे या गावातील तरुण पिढी देखील आकर्षित होत असून तिसरी देखील हा खेळ वयोवृद्ध ज्येष्ठांसोबत खेळत ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

पौराणिक कथेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती हा खेळ आवडीने खेळत असत. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे देव खंडोबा आणि देवी म्हाळसा यांच्यातही सारीपाट रंगत असल्याचे दाखले मिळतात. तसेच इतिहासकाळात राजे, सरदार, पाटील आणि देशमुख मंडळी हा खेळ मोठ्या आवडीने खेळत असत.मात्र खंडोबा व म्हाळसाकांत यांच्यात ही सारिपाटचा खेळ खेळला जात असल्याचे दर्शन “जय मल्हार,या मालिकेतून साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आणि अशी ही या खेळाची परंपरा आज ही ग्रामीण भागात टिकून आहे आणि ती आवडीने जोपासली जात असल्याचे संभे गावातून दिसून येते आहे.

या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असुन सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्याचा वापर केला जात आहे. लाकडी सोंगट्या पटावर घेऊन हा खेळ सुरु होतो.तर फासे म्हणून कवड्यांचे दान घेतले जातो. हा खेळ दोन गटात खेळला जात असुन दोन्ही संघाकडे एकूण १६ (प्रत्यकी ८) सोंगट्या असतात. या खेळात १० किंवा २५ दान पडल्याशिवाय हा खेळ सुरु होत नाही.या खेळात दहा, पंचिवीस, दोन,तीन,चार, सहा, अशी दाने पडतात. तर सारिपटावर असणाऱ्या (x) चौकटीत ‘चिरा’ म्हणतात येथे असणारी सोंगटी सुरक्षित असते. तीला मारता येत नाही.ज्या गटाच्या सोंगट्या मध्यस्ती जातील तो गट विजयी होतो. तर एका गटाने सोंगटी मारल्यानंतर दुसऱ्या विरोधी गटाने सोंगटी मारल्या नंतर खेळ बरोबरीत सुटतो.

सारिपटाचा एक डाव पूर्ण होण्यासाठी तीन ते चार तास लागतात पूर्ण जागरण होण्यासाठी दोन ते तीन डाव होतात. विशेष म्हणजे या खेळात पैशाचा वापर केला जात नाही.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ जागरण म्हणून खेळला जातो.ही या खेळाची परंपरा संभे गावातील नागरिकांनी जपली असून रोहा तालुक्यातील गोवे संभे सह काही विशेष गावात येथे हा खेळ खेळला जात आहे.

प्रतिक्रिया.
राजे महाराजांचा विरंगुळा इतिहासकाळात राजे, सरदार,पाटील आणि देशमुख मंडळी हा खेळ मोठ्या आवडीने खेळत होते. आजच्या इंटरनेट डिजिटल युगात आणि मोबाईल गेम्सच्या प्रभावामुळे हा पारंपरिक खेळ हळूहळू लोप पावत चालला आहे. मात्र, तालुक्यातील संभे आणि गोवे या गावात विशेषतः गणेशोत्सव तसेच नवरात्रो उत्सव सार्व. उत्सव काळात जागरणाचा भाग म्हणून जुनी-जाणती मंडळी हा खेळ आजही मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात खेळतात त्याचा अनुकरण येथील तरुण पिढीने जोपासत ही परंपरा टिकवून ठेवली आहे.
…. विलास दहींबेकर संभे रोहा.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us