Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्सला १०८ वर्षे पूर्ण; १०८ जणांचे रक्तदान! स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा संकल्प; स्टाफ, कामगार व कंत्राटी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग
ताज्या बातम्या

डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्सला १०८ वर्षे पूर्ण; १०८ जणांचे रक्तदान! स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा संकल्प; स्टाफ, कामगार व कंत्राटी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्सला १०८ वर्षे पूर्ण; १०८ जणांचे रक्तदान!

स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा संकल्प; स्टाफ, कामगार व कंत्राटी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहे तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या १०८व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या १०८ वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधत तब्बल १०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘१०८’चा अनोखा संकल्प पूर्ण केला. त्यामुळे यंदाचा स्थापना दिन सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे विशेष ठरला.
कंपनीच्या वतीने गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी कंपनीच्या परिसरात जिल्हा शासकीय रक्त केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग-रायगड यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ५५ स्टाफ कर्मचारी, ३० कामगार आणि २३ कंत्राटी कामगार, अशा एकूण १०८ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या माध्यमातून १०८ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोखंडे, अमित घाग, निलेश वारंगे, नितीन वारंगे, अमित मोहिते, ज्ञानेश्वर साळुंखे, मंगेश देवकर आणि सचिन मोरे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी कंपनीचे प्लांट हेड शैलेंद्र साळवी, एचआर हेड अनिल जांभळे, सेफ्टी मॅनेजर अरूण माने,अकाउंट मॅनेजर ओमकार अलिम, अकाउंट विभागाचे निलेश शेडगे, राकेश खांडेकर, अनिकेत पाटील, केतन पवार, स्मिता परतने, सागर जाधव यांच्यासह कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच युनियन कमिटीचे अध्यक्ष अनिल खैरे यांच्यासह मयूर चव्हाण, अमोल नाडार, मंगेश साळवी, सागर वेटकोळी, सचिन जाधव आणि प्रविण ठमके यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
यावेळी मार्गदर्शन करताना एचआर मॅनेजर अनिल जांभळे म्हणाले की, कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उद्योगाची प्रगती साधतानाच समाजाच्या गरजा ओळखून त्यासाठी योगदान देणे हीदेखील कंपनीची सामाजिक जबाबदारी आहे. कंपनीमध्ये एकत्र कुटुंबाप्रमाणे काम करण्याचे वातावरण असून सामाजिक उपक्रमांमध्ये कामगार नेहमीच पुढाकार घेतात. हा सामाजिक बांधिलकीचा वसा यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
डीएमसीसीच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मागील वर्षी २५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. या सामाजिक योगदानाची दखल घेत जिल्हा शासकीय रक्त केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग-रायगड यांच्या वतीने कंपनीला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
यंदा कंपनीच्या १०८ वर्षांच्या प्रवासाला १०८ रक्तदात्यांच्या रक्तदानाची जोड मिळाल्याने स्थापना दिनाचा सामाजिक संदेश अधिक प्रभावी ठरला. अधिकारी, कर्मचारी, कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘उद्योगाची प्रगती आणि समाजसेवा’ ही भावना अधोरेखित झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us