Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा तालुक्यात २९ सप्टेंबरला दोन ठिकाणी रोजगार मेळावे युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; रोशन चाफेकर यांचे आवाहन
ताज्या बातम्या

रोहा तालुक्यात २९ सप्टेंबरला दोन ठिकाणी रोजगार मेळावे युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; रोशन चाफेकर यांचे आवाहन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा तालुक्यात २९ सप्टेंबरला दोन ठिकाणी रोजगार मेळावे

युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; रोशन चाफेकर यांचे आवाहन

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या रोजगार महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोहा तालुक्यात दोन ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवाला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विविध कंपन्या, उद्योग व आस्थापनांचे प्रतिनिधी मेळाव्यात सहभागी होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती व निवड प्रक्रिया घेणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील रोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर रोजगार मेळावा समन्वय समिती कार्यरत आहे. या समितीच्या अध्यक्षपदी साईनाथ श्रीखंडे, तर सदस्यपदी रोशन चाफेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे.
रोह्यात दोन ठिकाणी मेळावा
रोहा तालुक्यात श्रीमती गीता तटकरे तंत्रनिकेतन महाविद्यालय, गोवे-कोलाड तसेच भारतीय एज्युकेशन सोसायटी/चॅरिटेबल ट्रस्ट, वेलशेत येथे २९ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने रोहा तालुक्यासह परिसरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार मेळावा समितीचे सदस्य तथा रोहा-अष्टमी नगरपरिषदेचे नगरसेवक रोशन चाफेकर यांनी केले आहे.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी हा मेळावा नोकरीच्या संधीशी थेट जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us