Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»१० वर्षांची गुलामगिरी अन् दोन मुलींची तीन वर्षांची ताटातूट संपली.सर्वहारा जन आंदोलनाच्या रेट्यामुळे दोन मुलींची सुटका आई वडिलांशी भेट.
ताज्या बातम्या

१० वर्षांची गुलामगिरी अन् दोन मुलींची तीन वर्षांची ताटातूट संपली.सर्वहारा जन आंदोलनाच्या रेट्यामुळे दोन मुलींची सुटका आई वडिलांशी भेट.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

१० वर्षांची गुलामगिरी अन् दोन मुलींची तीन वर्षांची ताटातूट संपली.सर्वहारा जन आंदोलनाच्या रेट्यामुळे दोन मुलींची सुटका आई वडिलांशी भेट.

कोलाड (श्याम लोखंडे) गेल्या दहा वर्षांपासून कोळसा भट्टीवर विटबिगारी करणाऱ्या वाघमारे कुटुंबाची अखेर छळातून सर्वहारा जनआंदोलनाच्या अथक पाठपुराव्यामुळे मुक्तता झाली असून, मालकाच्या ताब्यात असलेल्या मजुरांच्या दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी गळाभेट झाल्याचे समोर आले आहे. ‘सर्वहारा जन आंदोलन’ संघटनेने केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे यश आले असल्याची माहिती संघटनेच्या प्रमुख व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या मार्गदर्शाखाली संघटनेचे मुख्य पदाधिकारी सोपान सुतार यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती मूळचे वरवटणे (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले संतोष जानू वाघमारे आणि त्यांची पत्नी सुनीता वाघमारे यांना दहा वर्षांपूर्वी अनिल चव्हाण (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याने कामासाठी कर्नाटक राज्यातील रायपूर येथे नेले होते. तेथे हे कुटुंब सतत दहा वर्षे कोळसा पाडण्याचे अथवा विट काम करत होते. मात्र, या कामाचा योग्य मोबदला न देणे आणि मालकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून वाघमारे दांपत्य ऑक्टोबर २०२५ मध्ये तेथून पळून नागोठणे येथे आले.

मालक अनिल चव्हाण याने संतोष आणि सुनीता पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या लहानग्या मुली अनिता आणि पूजा या त्यांच्या दोन मुलींना गेल्या तीन वर्षांपासून आपल्या ताब्यात (ओलीस) ठेवले होते. त्यामुळे स्वतःची सुटका करून घेताना पोटच्या गोळ्यांना तिथेच सोडून येण्याची दुर्दैवी अथवा चिंताजनक परिस्थिती पालकांवर ओढवली होती.मात्र हा विषय ‘सर्वहारा जन आंदोलन’ संघटनेकडे आल्यानंतर संघटनेने तातडीने सूत्रे हलवली आणि याची सखोल माहिती घेऊन. हे प्रकरण कर्नाटकशी संबंधित असल्याने सुरुवातीला मालक अनिल चव्हाण याने मुली आपल्या ताब्यात असल्याचे नाकारले. मात्र, संघटनेने कायदेशीर कारवाईचा आणि पोलिसांत तक्रार करण्याचा कठोर इशारा दिल्यानंतर मालक नरमले. अखेर मुली आपल्याकडे असल्याचे त्याने मान्य केले.

संघटनेच्या दणक्यानंतर अनिल चव्हाण याने रविवारी २२ मार्च २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अनिता आणि पूजा या दोन्ही मुलींना तब्बल तीन वर्षा नंतर त्यांचे आई-वडील संतोष आणि सुनीता वाघमारे यांच्या स्वाधीन केले. तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आपल्या मुली सुखरूप परत मिळाल्याने वाघमारे कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.तर मालकाने दहा वर्षे राबवून घेऊनही मजुरीचा हिशोब दिलेला नाही. या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी संघटना आता पुढील पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us