चाकरमानी गेले कामाला.चैन पडेना आम्हाला..
गावात झाला पुन्हा शुकशुकाट.
प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे
देवांचा आधिपती गणाधीराज बुद्धी ची देवता सुखकर्ता,दु:ख हर्ता गणरायाच्या आगमनाची लागलेली आस आणी मुल सुन नातवंडे येणार म्हणून आई वडील आजी आजोबा नी घर साफ स्वच्छ करून रंगरंगोटी करून किरकोळ सामान भरून ठेवलेली तयारी ची लगबग हे गणरायाच्या आगमाना बरोबर घर प्रफुल्लित होण्याचा आनंद म्हणजे स्वर्ग सुखा सारखे वाटते गणपती सणाचे आनंदी आनंद चे दिवस कसे जातात ते समजले नाही पुजा आरती नाश्ता,गोडा घोडाचे नैवेद्य जागरण भजन जिकडे तिकडे आंनदोत्सव वातावरणात दिसून येत होताअशा धार्मिक कार्यक्रम मुलं नातवंडे यांच्या गडबड गोंधळ दंगा मस्ती घराला आलेले घरपणआणीगौरी – गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. आणी घरा भोवतीचा गजबजाट शांत झाला,चाकरमानीआपापल्यासंसाराला आणि शहराकडे परतले.नातवंड पतवंडांनी भरलेलं घर पुन्हा एकदा रिकामे झाले.कोकणातील प्रत्येक आज्जी, आजोबा,आई वडील आज एकटेच दाराबाहेर पाहात बसले असतील.”बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या” असं गणरायाला साकडं घालत असतील.निघताना पाणावलेल्या डोळ्यांनी ‘सावकाश जावा रे.हातपाय संभाळू काम कर रे.लेकांना मारु नको, पोरींवर लक्ष ठेव, घरी पोचल्यावर फोन करा’ असं सांगून निरागस चेहरा आणि मग मागे उरतो तो हा सुना- सुना पडलेला पडवीचा ओटा आणि रिकामं झाले घर. वाटेकडे डोळे लावून बसलेली ‘आई’.पाच- सहा दिवसघरात हसण्या-खिदळण्याचा,लेकरा-नातवंडांचा आवाज असतो.घर कसं माणसांनी भरून गेलं होत पण सण संपतो,बॅगा भरल्या जातात आणि गाड्यासुटतात.. गाडी निघताना पदराने डोळे पुसत ती म्हणते,”पोहोचल्यावर फोन करा रे, आणि पुढच्या गणपतीला लवकर या…”गाडी निघून गेल्यावर मात्र घराचा उंबरठा असाच शांत होतो. संपूर्ण वर्षभर तिच्या आयुष्यात उरते ती फक्त एकच गोष्ट- “तुमची वाट बघणं! “घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या शहरात आपण कितीही व्यस्त झालो, तरी गावी एकामाऊलीचे डोळे रोज त्या पाय वाटेकडे लागलेले असतात. शक्य असेल तर फक्त गणपती पुरतंच मर्यादित न राहता,जमेल तसा वेळ काढून आपल्या या माऊलीला, वडिलांना आपल्या गावाला नक्की भेटायला जा. कारण तिला पैशांची किंवा महागड्या वस्तूंची गरज नाही तर फक्त तुमच्या सहवासाची आणि दोन गोड शब्दांची भूकअसते. “या चिमण्या नो परत फिरा रे घराकडे आपल्या नजरा”अशी अवस्था वडीलधाऱ्यांची होते. रोजगार उपलब्ध नसल्याने शहराकडे चाकरीस गेले आहेत गाव ओस पडली त्यामुळे गावाच गावपण हरवले आहे.ग्रामीण भागातील वास्तववादी चित्र आहे. घरदार सांभाळून ठेणाऱ्या सर्व आई, वडील,आजी आजोबांना देव उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देवो हीच श्री गणराया चरणी प्रार्थना !!