Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»श्रावणसरींच्या साक्षीने शब्दफुलांचा बहर! कोमसाप रोहा शाखेची वर्षा सहल, कविसंमेलन व विविध उपक्रम उत्साहात संपन्न
ताज्या बातम्या

श्रावणसरींच्या साक्षीने शब्दफुलांचा बहर! कोमसाप रोहा शाखेची वर्षा सहल, कविसंमेलन व विविध उपक्रम उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 12, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्रावणसरींच्या साक्षीने शब्दफुलांचा बहर!
कोमसाप रोहा शाखेची वर्षा सहल,

कविसंमेलन व विविध उपक्रम उत्साहात संपन्न

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रोहा शाखेच्या वतीने साहित्यिकांसाठी आयोजित करण्यात आलेली वर्षा सहल, कविसंमेलन आणि विविध साहित्यिक उपक्रम तळाघर येथील निसर्गरम्य बयोज फार्म येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात झालेली ही साहित्यिक वर्षा सहल सहभागींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरली.
कोमसाप जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या ताम्हण वृक्षाला आलिंगन देऊन सहलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा समन्वयक तथा रायगड भूषण सुखद राणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
स्वागत समारंभानंतर ‘रायगड रत्न’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या कोमसाप रोहा शाखेच्या संध्या दिवकर आणि राजेंद्र जाधव यांचा रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल तसेच कोमसाप रोहा शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्य वैशाली सलागरे आणि मृणाल पेंडसे यांचाही पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी संध्या दिवकर यांच्या ‘श्वेतराज’ या पहिल्या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप रोहा शाखाध्यक्षा संध्या दिवकर यांनी केले. त्यानंतर रंगलेल्या कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाहेर श्रावणसरी बरसत असताना बयोज फार्म परिसरातील गारवा, सुगंधी हवा, विविध औषधी व देशी वृक्षांची हिरवाई आणि कवींचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण साहित्यिक रंगात न्हाऊन निघाले.
विविध विषयांवरील कविता सादर करताना कवींनी उपस्थितांची मने जिंकली. संध्या दिवकर आणि राजेंद्र जाधव यांच्या सामाजिक जाणिवा आणि समाजमनातील खंत व्यक्त करणाऱ्या कवितांनी विशेष दाद मिळवली. निसर्गाच्या सान्निध्यात झालेल्या या कविसंमेलनाने उपस्थितांना साहित्याची आणि निसर्गाची अनोखी ऊर्जा दिली.
अध्यक्षीय भाषणात सुखद राणे यांनी आपल्या खुमासदार शैलीत साहित्य, कविता आणि निसर्ग यांचा सुरेख मेळ साधत उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर सर्वांनी उत्तम सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. स्विमिंग तसेच कराओके कार्यक्रमाने सहलीत आणखी रंग भरला. कराओकेमध्ये विजय दिवकर, संध्या दिवकर, रिद्धी बोथरे, वैशाली साळुंके, राज काफरे, पाटील, सुचेता तटकरे, राजेंद्र जाधव आणि दिपाली जाधव यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला.
संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाखेचे सहसचिव भरत चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाखेचे युवा प्रतिनिधी शरद कदम यांनी केले.
या साहित्यिक सहलीत संध्या दिवकर, सुखद राणे, विजय दिवकर, भरत चौधरी, राजेंद्र जाधव, शरद कदम, नेहल प्रधान, सुधीर क्षीरसागर, सुप्रिया क्षीरसागर, राज काफरे, मृणाल पेंडसे, वैशाली सलागरे, हनुमंत शिंदे, नारायण पानवकर, रिद्धी बोथरे, वैशाली साळुंके, सुचेता तटकरे, दिपा जाधव आणि मिलिंद बोंगार आदी साहित्यप्रेमींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय दिवकर आणि राजेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us